AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, असं म्हणत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिल माफी न देण्याचा चेंडू भाजपाकडे टोलवला आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी भाजप सरकारच्या काळातच वाढीव वीज बिलाचं संकट उभं राहिल्याचा आरोप केला आहे. 

'महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत', जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार
| Updated on: Nov 20, 2020 | 2:24 PM
Share

पुणे: वीज बिलाच्या मुद्द्यावरुन भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार करत मागील सरकारनं महावितरणचे 67 हजार कोटी रुपये थकवल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रावरील वाढीव वीज बिलाचं हे संकट भाजपनेच आणल्याचा आरोप केलाय. दरम्यान, भाजपच्या काळात वीज बिल थकलं असेल तर गरिबांनाच सवलत दिल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Jayant Patil’s allegation against BJP on the issue of increased electricity bill)

भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने आणि वीजबिलांची वसुली न केल्याने महावितरणाला फटका बसला. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, असं म्हणत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिल माफी न देण्याचा चेंडू भाजपाकडे टोलवला आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी भाजप सरकारच्या काळातच वाढीव वीज बिलाचं संकट उभं राहिल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम- फडणवीस

आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागानं उत्तम काम केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला लगावला आहे. वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारनं घुमजाव केलं आहे. हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. या सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात (Electricity Bill ) सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी (23 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार आहे.

संबंधित बातम्या:

महावितरणला सर्वात मोठा फटका भाजपमुळेच, तब्बल 50 हजार कोटींची थकबाकी : नितीन राऊत

भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस

मनसेचा निर्धार, 24 तारखेला ऊर्जामंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

Jayant Patil’s allegation against BJP on the issue of increased electricity bill

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.