पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला वडेट्टीवारांची पुष्टी, पण…

पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये काँग्रेस- शिवसेना सरकार स्थापनेचा प्रयत्न झाला होता, असा खुलासा केला होता. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याची पुष्टी केली  (Vijay Wadettiwar on Prithviraj Chavan statement) आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला वडेट्टीवारांची पुष्टी, पण...
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 4:55 PM

चंद्रपूर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये काँग्रेस- शिवसेना सरकार स्थापनेचा प्रयत्न झाला होता, असा खुलासा केला  आहे. त्यावर आता राज्यात राजकीय वादळ उठले (Vijay Wadettiwar on Prithviraj Chavan statement) आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याची पुष्टी केली  आहे. “अल्पमतातील भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी शिवसेनेनं असा प्रस्ताव दिला होता. मात्र ही केवळ चर्चा होती. ठोस काही नसल्याने हा प्रस्ताव बारगळला”, असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

“अल्पमतातील भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी शिवसेनेनं असा प्रस्ताव दिला होता. आताचा जो फॉर्म्युला आहे. त्यावर काही काम करावं का? तो फॉर्म्युला वापरुन राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने सरकार स्थापन करावं का? याबाबत चर्चा झाली होती. पण हा प्रस्ताव कोणी दिला. कोणाकडून प्रस्ताव आला होता. मात्र केवळ चर्चा होती. ठोस काही नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. काँग्रेसची भूमिका ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ठरवतात. त्यामुळे केवळ चर्चा होती. मात्र काही ठोस भूमिका घेतली नव्हती. त्या वेळेस निवडून आलेल्या बहुतांश लोकांना हा प्रस्ताव स्वीकारावा असे वाटत होतं,” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

दरम्यान “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याप्रकरणी काँग्रेस विरोधी भूमिकेत आहे. सध्याचे सरकार किमान समान कार्यक्रमावर आहे. मात्र आम्ही तत्त्व गुंडाळले नसल्‍याचे वडेट्टीवार यावेळी (Vijay Wadettiwar on Prithviraj Chavan statement) म्हणाले.”

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर विचाराला विरोध करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे असे मत मांडले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा सावरकरांना कायम विरोध आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली.

“सावरकरांना भारतरत्न देण्याच्या प्रश्नी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे. आम्ही आमची तत्त्व मात्र गुंडाळलेली नाही असेही वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. संजय राऊत काहीही म्हणू दे, आमचा सावरकरांना विरोध कायम आहे,” असे वडेट्टीवार पुन्हा एकदा म्हणाले.

एकीकडे राज्यात तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी सरकार स्थापन केले आहेत. तर दुसरीकडे विविध विषयांवर अनेक नेते वेगवेगळी भूमिका मांडत असल्याने राजकीय गोंधळ वाढत (Vijay Wadettiwar on Prithviraj Chavan statement) आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.