Priyanka Chaturvedi : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांचा सन्मान करा; प्रियंका चतुर्वेदी म्हणतात, सुरुवात महाराष्ट्रापासून करा

Priyanka Chaturvedi : मोदींनी घराणेशाहीवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देशात अनेक घराणी आहेत. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी आज भाजपमध्ये आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, मुंडे आणि महाजन ही काही कुटुंबांची उदाहरणे दिली जातील. त्याचं काय करायचं?

Priyanka Chaturvedi : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांचा सन्मान करा; प्रियंका चतुर्वेदी म्हणतात, सुरुवात महाराष्ट्रापासून करा
प्रियंका चतुर्वेदीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 2:31 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महिलांचा अपमान करू नका. महिलांचा सन्मान करा, असं आवाहन देशवासियांना केलं. मोदी यांच्या या आवाहनाचा शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी समाचार घेतला आहे. महिलांचा सन्मान करायचा असेल तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करा, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) मंत्रिमंडळात एकही महिला नाही. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण मंत्रालय एका पुरुषाकडे देण्यात आलं आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे सुली बाई बुली होत आहे, अशी टीका करतानाच आधी महिलांना 33 टक्के आरक्षण द्या, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या कार्यालयात मोठी वॉशिंग मशीन लावली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या केसेस आता थंड बस्त्यात ठेवून दिल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक आता भाजपला भ्रष्टाचारी पार्टी बनवत आहे, अशी टीकाही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

सिंधिया, मुंडे, महाजन ही घराणी नाहीत का?

मोदींनी घराणेशाहीवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देशात अनेक घराणी आहेत. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी आज भाजपमध्ये आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, मुंडे आणि महाजन ही काही कुटुंबांची उदाहरणे दिली जातील. त्याचं काय करायचं? असा सवाल करत त्यांनी भाजपमधील घराणेशाहीवर टीका केली. शिवसेना, टीएमसी, आरजेडी, डीएमके, काँग्रेसचे नेतृत्व करणारे लोकांना जनतेने निवडून दिलं आहे. आपण जनतेचा अपमान करत आहात, असंही त्यांनी सांगितलं.

मोदींच्या कथनी आणि करनीत फरक

देशात आता ध्रुवीकरणाचं मॉडेल तयार झालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. मोदींनी देशातील महागाई, ध्रुवीकरणावर बोलायला पाहिजे. मोदींच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.