AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा, थेट..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागासाठी अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या.

1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा, थेट..
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 3:08 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली. यासोबतच अनेक महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजेच आता ज्या गावाची लोकसंख्या 1 हजारापेक्षा जास्त असेल तिथे कॉंक्रिट रस्त्याने जोडले जाईल. मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार आहे. 1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या ७ कोटीपर्यंत वाढेल,असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद

2047  पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे. 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे. राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल. राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

नाशिकबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा 

मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 पर्यंत करणार. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अनुसुचित जातींसाठी 2026-27 मध्ये 23 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद

आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21 हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली. अनुसुचित जातींसाठी 2026-27 मध्ये 23 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मागेल त्याला शेतपंप या अर्थसंकल्पातून मोठी घोषणा करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठी घोषणा केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...