AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget LIVE Updates : स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा सेवा सुरू!

Budget LIVE Updates : स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा सेवा सुरू!

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 06, 2026 | 2:40 PM
Share

महाराष्ट्र शासनाने कृषी जीडीपी वाढवण्याचे, डिजिटल शेतीला प्रोत्साहन देण्याचे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तर कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती आणि पशुधन विकासावर भर दिला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही नव्या योजना सुरू करण्यात आल्या असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी माहिती देताना फडणवीस यांनी सांगितलं की, राज्याचा कृषी जीडीपी 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ॲग्री स्टॅक, महाविस्तार एआय आणि वसुधा यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती दिली जात आहे. महाराष्ट्र देशात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल शेतीमध्ये आघाडीवर आहे.

महाराष्ट्र शासनाने 2026 च्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा टप्पा एक अंतर्गत 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा दोनची कामे प्रगतीपथावर असून, आता टप्पा तीन अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जाणार आहेत. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देऊन या क्षेत्रांच्या विकासाला चालना दिली जात आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Published on: Mar 06, 2026 02:40 PM

Follow Us
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?