सरकारी वकिलांच्या टार्गेटवर महाजन, बावनकुळेंसह सात नेते, सातही नेते भाजपचेच, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 08, 2022 | 8:06 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठा धमाका केला. फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात सुरू असलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. थेट सरकारी वकीलच हे षडयंत्र रचत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

सरकारी वकिलांच्या टार्गेटवर महाजन, बावनकुळेंसह सात नेते, सातही नेते भाजपचेच, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
सरकारी वकिलाचे टार्गेट सात नेते, सातही नेते भाजपचेच, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठा धमाका केला. फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात सुरू असलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. थेट सरकारी वकीलच हे षडयंत्र रचत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. माझ्यासहीत गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे असे आम्ही सातही नेते या वकिलाच्या टार्गेटवर होतो. तसं या वकिलाच्या संभाषणातून स्पष्ट होतंय, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विशेष सरकारी वकिलाच्या संभाषणाचा एक व्हिडीओ असलेला पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही देवेंद्र फडणवीसांनी केली. मात्र, फडणवीसांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज मोठा गौप्यस्फोट केला. 2021मध्ये गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केला. 2018मध्ये मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे. पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यकाने अपहरण केल्याच बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे असं सांगून मोका लावण्याचे कागदपत्रं तयार झाले. कोर्टाने महाजनांना दिलासा दिला. राज्य सरकार काय षडयंत्र करते ते सांगतो. एका कत्तलखान्याची कथा. विरोधकांची कत्तल कशी करायची हे षडयंत्र शिजतंय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण हे या षडयंत्राचे कर्ते आहेत, असा दावा फडणवीसांनी केला.

काय आहे संभाषण?

व्हिडीओ क्रमांक 24मध्ये सरकारी वकिलाचं हे संभाषण आलं आहे. त्यात भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्याचा कसा प्रयत्न झाला हे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांचे टार्गेट कोण आहेत, त्यावरही भाष्य करण्यात आले आहेत.

– गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली.
– अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे.
– फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर

– आपले टार्गेट कोण कोण आहेत?

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.
फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? सरकारमधल्या नेत्याचा सरकारला सवाल

महाजन ते मुनगंटीवार, एसीपी ते मुंबईचा सीपी, फडणवीसांनी सव्वाशे तासाचं स्टींग ऑपरेशन सभागृहात मांडलं, संवेदनशील भाग जशास तसा

गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकील, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर, षडयंत्रांचा शब्द ना शब्द सभागृहात मांडला