महाजन ते मुनगंटीवार, एसीपी ते मुंबईचा सीपी, फडणवीसांनी सव्वाशे तासाचं स्टींग ऑपरेशन सभागृहात मांडलं, संवेदनशील भाग जशास तसा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत (vidhansabha) सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांना मोक्काच्या केसमध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात होतं.

महाजन ते मुनगंटीवार, एसीपी ते मुंबईचा सीपी, फडणवीसांनी सव्वाशे तासाचं स्टींग ऑपरेशन सभागृहात मांडलं, संवेदनशील भाग जशास तसा
ड्रग्जप्रकरणात महाजनांना अडकवण्यासाठी सरकारी वकिलांचच षडयंत्र, फडणवीसांच्या दाव्याने विधानसभा हादरलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 8:10 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत (vidhansabha) सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांना मोक्काच्या केसमध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात होतं. याचा पर्दाफाश त्यांनी विधानसभेत केला. सरकारी वकील, पोलीस, मंत्री आणि नेते कशा पद्धतीने या षडयंत्राचा भाग होते. महाजनांना ड्रग्जप्रकरणात अडकवण्याचं कसं षडयंत्रं होतं. गुन्हा कसा प्लांट केला जाणार होता, रेड कशी मारली जाणार होती, साक्षीदार कसे तयार केले जाणार होते आणि न्यायाधीशांना कसं मॅनेज केलं जाणार होतं? याचा पर्दाफाशच देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस एवढंच करून थांबले नाहीत तर त्यांनी एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यात व्हिडीओच्या रुपात सर्व पुरावे असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणाची चौकशी पोलीस निष्पक्षपातीपणे करू शकत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची मागणी त्यांनी केली. हे प्रकरण सीबीआयला दिलं नाही तर स्वत: कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या आरोप आणि दाव्यांनी एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत काय संवाद होते याची माहिती फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. ही माहिती जशीच्या तशी खालील प्रमाणे.

व्हिडीओ -1

वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे. ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

व्हिडीओ-2

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

व्हिडीओ- 3

राजकारण करायचे असेल तर सीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे. मोठ्या साहेबांनी सांगितले. देशमुख 25 लाख रुपये घेऊन आले होते. पण, मी घेतले नाही. नंतर तो पकडला गेला. 25 लाखांत आपली गाडी झाली असती. तो स्वत: देत होता, तरी आपण घेतले नाही. नशिब कसे असते पहा. पण, त्याच दु:ख नाही. आपलीच माणसे आहेत. तो माणूस पाहिजे होता.

या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अ‍ॅड करायचे ते करा.

व्हिडिओ- 4

सातभायेने छगन भुजबळला पैसे घेऊन सोडले. मुंबईला एक पाटणकर नावाची वकील आहे. जज मॅनेज करणे, एवढेच तिचे काम आहे. 1 कोटी ठरले, तर 50 लाख ती ठेवते आणि 50 लाख देते. गिरीश महाजनची फाईल होती, ती पुढे सरकवायला पाहिजे. रावलला आतमध्ये टाकले असते आणि महाजनला उचलले असते. हे दोन उचलले असते, तर हादरून गेले असते.

व्हिडिओ- 8

– सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला.

– पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपी ला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.

– सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.

व्हिडिओ- 9

अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्‍यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.

व्हिडिओ- 10

त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते? – किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात. या सर्वांनी पवारांना पत्र दिले. – गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

व्हिडिओ- 11

– साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली. – अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.

व्हिडिओ- 12

– कुणाला अटकवायचे? जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे, मुनगंटीवार नागपूरहून मला फोन आला. पुढच्या आठवड्यात कुठे आहे, असे विचारले. मुंबईला केव्हा येणार? शुक्रवारी ये. मी गेलो, तेव्हा पीएस राऊत तेथे नव्हता. त्याने दुसर्‍याचा नंबर दिला. मी जातो मंत्रालयात तेव्हा कधीच माझी एन्ट्री नसते. ना जाण्याची-ना येण्याची. चर्चा केली.

व्हिडिओ- 13

– साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के. गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.

व्हिडीओ- 14

– मी सारे काही टाईप करून दिले. त्यांना फक्त ए4 वर टाईप करायला सांगितले. खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले. सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला, याची माहिती काढली. मग एफआयआरमध्ये लिहिले. 2 लाख कुठे दिले, 3 लाख कुठे दिले? मग आपण काय काय दाखविले. किमया हॉटेल दाखवायचे होते. पण, उद्या कायद्यात अडकू नये, म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो. उगाच रिस्क नको. संपूर्ण सर्वे केला.

व्हिडीओ- 16

– अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी. – नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात. 2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील. काय लागतं. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही. एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.

व्हिडीओ- 18

– अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण – रेडमध्ये सहभागी होणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन – जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत. – यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ- 19

विजू पाटीलशी दूरध्वनी संवाद – गिरीश महाजनचे नाव टाका. मी जबाब तयार करतो. – पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश देतो आहे. भोईटे जाईल, तेव्हा आपला माणूस जाईल आणि तेथे ऐवज ठेऊन देईल. – कुणाकडून काय जबाब घ्यायचे, हेही समजावून सांगितले आहे.

व्हिडीओ- 20

एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण संभाषण – हॉटेलचे बिल देऊ नका, 10 हजार दिले आहेत. – तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहे. – पंचांची नावे मी व्हॉटसअ‍ॅपवर पाठवितो. – दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील. – जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील.

व्हिडीओ- 21

एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबत फोन कॉल – पंचनामा मॅनेज करा, की 6.30 वाजता ऑर्डर मिळाली पाहिजे. – डीडीआर ओळखीचा असेल तर बोलाविणे. – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणांहून 5 पंच लागतील. उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच ठरवून घ्या. – वकिल स्वत:च फोन करून माणसं ठरवितात. काही बोलू नका. कारण मॅटर सेंसेटिव्ह आहे. फक्त शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा.

व्हिडीओ- 22

कुठल्यातरी मॅडमशी संवाद – पवारसाहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो. मी, जयंत पाटील असे अजितदादांकडे जातो. मी स्वत: येणार नाही. कारण, मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे, याचा पुरावा मिळेल.

व्हिडीओ- 23

विजू पाटीलशी संभाषण – अशी बातमी लीक करा, की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे व्हॅकेट झाला आणि अटक होणार आहे, अशी सुद्धा बातमी पसरवा. त्यामुळे मेंटालिटी खराब होईल. – वीरेंद्र भोईटेला माफीचा साक्षीदार करायचे असेल तर वकिल लावावा लागेल. तो होत असेल तर आपण त्याला मदत करू.

विजू पाटील शी संभाषण – चॅनेलला बोलावून सर्व दाखवा. त्यांना काय दाखवायचे ते सांगा. – गिरीश महाजन यांच्या पापाचा घडा भरला आहे, असे सांगा. – मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील, ते दाखवायला सांगा.

व्हिडीओ- 24

– गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली. – अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे. – फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर

– आपले टार्गेट कोण कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे. फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.

व्हिडीओ- 25

– कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात. मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा. माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे पवार साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.

व्हिडीओ- 26 ए

(अनिल गोटे यांच्याशी कॉल) ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण? तावडे/गिरीश महाजन/रावल/देवेंद्र फडणवीस/रणजित पाटील सर्व फाईली आहेत आपल्याकडे. झेरॉक्स देतो. कुठे भेटणार? तीच आरबीआयजवळील 302 नंबरची खोली. साहेबांची इच्छा आहे, करू आपण सगळे, खचून नका जाऊ. संजय राऊतांची वेळ घ्या, मी सोबत येतो. आपल्याजवळ सगळे आहे, करू आपण सगळे. साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. साहेब म्हणाले मी सांगतो. सीएम फाऊंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीणमध्ये करतोय, साहेबांचे बोलणे झाले आहे.

व्हिडीओ- 27 बी

अनिल गोटे आणि वकिलाचा संवाद

अनिल गोटेंची एन्ट्री, सीएम रिलिफ फंडची फाईल घ्यायला आलो. वकिल महोदय सांगतात, सापडत नाही. शोधून देतो. ओरिजिनल साहेबांकडे आहे. माझ्याकडे झेरॉक्स आहे. आपल्याकडे 4 फाईली आहेत. पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो. पांडे साहेब शंभर टक्के करणार म्हणजे करणार. तो एकमेव माणूस आहे. पाया पडला.

व्हिडीओ-28 सी

वकिल : मंगेश चव्हाणची फाईल देतो. गोटे : मंगेश चव्हाणच्या फाईलमध्ये मला इंटरेस्ट नाही. वकिल : मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ- 29 डी

गोटेंना फाईल देताना वकिलाचा असिस्टंट म्हणतो की, आपण एक कॉपी काढून ठेऊ या. वकील म्हणतात, गोटे आणि आपण काय वेगळे आहोत काय, त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे. ते मंत्री झाले, म्हणजे आपण मंत्री झालो. मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो, तो धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजावून सांगेल.

व्हिडीओ-30 ई

पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला 10 कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल.

व्हिडीओ-31 एफ

अ‍ॅड. एम. डी. पाटील यांचा कॉल येतो आणि ते रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार ओपीनियन ड्राफ्ट करून मागतात. सदर वकिल त्यांना ते ड्राफ्ट करून पाठवितो, असे उत्तर देतात. अ‍ॅड. एम. डी. पाटील हे पुण्यातील सरकारी वकील आहेत रश्मी शुक्ला प्रकरणात.

व्हिडीओ- 32-जी-एच

वकिल : साहेबांनी नगराळेला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले. पण, ऐकतच नाही, काय करायचे? साहेब म्हणाले, तुला जे जे पाहिजे ते ते कर. फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला. वकिल : आपले जजेस आणायचे. कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची.

व्हिडीओ-34-जे

सरकारी वकिल म्हणतात, नवाब मलिक यांनी सांगायचे असते की, हा जो फ्रॉड आहे तो मला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला. जे 10 कोटी भाजपाला दिले, ते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले, असेही सांगायचे. ते गोटे यांना विचारतात, 2014 मध्येच डोनेट केले ना? केव्हा केले निवडणुकीच्या आधी की नंतर? जोरदार पत्रपरिषद घ्या! जयंत पाटील यांना कॉल अनिल गोटे जयंत पाटील यांना फोन लावतात आणि म्हणतात, आम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला अर्जंट. उद्या मुंबईत भेटायचे काय? मग हा फोन अ‍ॅड. चव्हाण यांना देतात. मग ते बोलू लागतात, मागचे विषय राहिले आहेत. आता पांडे साहेब आले आहेत. मेडिकलची फाईल आहे. उद्या किती वाजता? 3 वाजता का? यांना एक तक्रार ड्राफ्ट करून देतो आहे. उद्या ते ईडीकडे जाणार आहेत. या कॉलवर बोलले तर चालेल ना. जयंतराव सांगतात, फेसटाईमवर बोला. मग फेसटाईमवर फोन लावला जातो. पण, जयंतराव उचलत नाहीत.

ऑडिओ-1

– पवार साहेबांची वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही. अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले. वळसे काहीच करीत नाही. आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते. कोर्टात काय भूमिका मांडायची, हे तेच ठरवतात. ते म्हणतील ते ठरते.

ऑडिओ-2

– गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल, असे स्टेटमेंट घ्या. विश्वजितचे स्टेटमेंट घ्या. 18 चे स्टेटमेंट झाले तर मजा येईल. एक लेडिज कोण आहे, तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटक होऊन जाईल.

ऑडिओ-3

– राजकारण करायचे असेल तर सीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे. मोठ्या साहेबांनी सांगितले. देशमुख 25 लाख रुपये घेऊन आले होते. पण, मी घेतले नाही. नंतर तो पकडला गेला. 25 लाखांत आपली गाडी झाली असती. तो स्वत: देत होता, तरी आपण घेतले नाही. नशिब कसे असते पहा. पण, त्याच दु:ख नाही. आपलीच माणसे आहेत. तो माणूस पाहिजे होता.

ऑडिओ- 4

– सातभायेने छगन भुजबळला पैसे घेऊन सोडले. मुंबईला एक पाटणकर नावाची वकील आहे. जज मॅनेज करणे, एवढेच तिचे काम आहे. 1 कोटी ठरले, तर 50 लाख ती ठेवते आणि 50 लाख देते. गिरीश महाजनची फाईल होती, ती पुढे सरकवायला पाहिजे. रावलला आतमध्ये टाकले असते आणि महाजनला उचलले असते. हे दोन उचलले असते, तर हादरून गेले असते.

संबंधित बातम्या:

गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकील, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर, षडयंत्रांचा शब्द ना शब्द सभागृहात मांडला

भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय ‘हा’ तरूण

VIDEO: ईडीचं वसुलीचं रॅकेट ते सोमय्यांच्या मुलाला निकॉनची पार्टनरशीप; संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.