भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय ‘हा’ तरूण

Russia Ukraine War : भारतातील तामिळनाडूचा (Tamilnadu) एक तरूण रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. या 21 वर्षीय तरुणाचे नाव सैनिकेश रविचंद्रन (Sainikesh Ravichandran) आहे. सैनिकेश मूळचा तामिळनाडूतील कोईम्बतूरचा (Coimbatore) आहे.

भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय 'हा' तरूण
युक्रेन सैन्यात भरती झालेला भारतीय तरूण सैनिकेश रविचंद्रनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 6:20 PM

Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. युक्रेनला मदत करण्यासाठी अनेक देशांतील तरूण युक्रेनच्या सैन्यात भरती होत आहेत. दरम्यान, भारतातील तामिळनाडूचा (Tamilnadu) एक तरूण रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. हा तरुण युक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे. विशेष म्हणजे या भारतीय तरुणाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि सैन्याच्या अनेक प्रवेश परीक्षाही दिल्या, मात्र त्याची निवड होऊ शकली नाही. या 21 वर्षीय तरुणाचे नाव सैनिकेश रविचंद्रन (Sainikesh Ravichandran) आहे. सैनिकेश मूळचा तामिळनाडूतील कोईम्बतूरचा (Coimbatore) आहे. जेव्हा भारतीय अधिकार्‍यांना समजले, की सैनिकेश रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील झाला आहे, तेव्हा त्यांनी सैनिकेशच्या पालकांची चौकशी केली. या चौकशीत असे उघड झाले, की सैनिकेश रविचंद्रन याने यापूर्वी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा दिली होती, मात्र तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.

जुलै 2022मध्ये पूर्ण होणार होता कोर्स

एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तो अमेरिकन सैन्यात सामील होऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठी त्याने चेन्नईतील यूएस कॉन्सुलेटशीही संपर्क साधला. तिथूनही तो निराश झाला होता. भारतीय आणि यूएस सैन्यात सामील होण्यात अयशस्वी झाल्यानंतर, सनीकेश रविचंद्रनने 2018मध्ये युक्रेनमधील खार्किव येथील नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, रविचंद्रनचा कोर्स जुलै 2022मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे रविचंद्रन यांच्याशी संपर्क तुटल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले, त्यानंतर त्यांनी भारतीय दूतावासाकडे मदत मागितली, त्यानंतर त्यांनी रविचंद्रन यांच्याशी बोलणे केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या संवादादरम्यानच सैनिकेश रविचंद्रनने त्यांना युक्रेनच्या लष्करात सामील होण्याची माहिती दिली.

युक्रेनचे ‘आंतरराष्ट्रीय युनिट’

युक्रेनची मीडिया एजन्सी द कीव इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, अनेक देशांतील तरूण युक्रेनच्या सैन्यात सामील होत आहेत, या तरुणांसाठी युक्रेनच्या लष्कराने International Legion नावाचे एक नवीन ‘इंटरनॅशनल युनिट’ तयार केले आहे. युक्रेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिका, यूके, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील काही तरूण या युनिटमध्ये सामील झाले आहेत.

3,000 अमेरिकन नागरिकांचे अर्ज

रशियन हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी परदेशी सैनिक आणि नागरिकांची आंतरराष्ट्रीय युनिट स्थापन करण्याची घोषणा केली होती. इतर देशांतील नागरिकांची युद्धात जाण्याची इच्छा लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी इतर देशांचे नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. आतापर्यंत अनेक निवृत्त अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात, जवळजवळ 3,000 अमेरिकन लोकांनी झेलेन्स्की यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्यात सामील होण्यासाठी अर्ज केला.

आणखी वाचा :

आता काम आधार देण्याचं…; पोलंडमधल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ हृदयद्रावक Photo पाहिला का?

युद्धानं काय केलं पाहा! आई-वडिलांशी ताटातून, देश सोडण्यासाठी चिमुरड्याचा तब्बल 1400 KM प्रवास

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर टाकला 500 किलोचा बॉम्ब, युक्रेनच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.