युद्धानं काय केलं पाहा! आई-वडिलांशी ताटातून, देश सोडण्यासाठी चिमुरड्याचा ओक्साबोक्शी रडत 1400 KM प्रवास

Russia Ukraine War : या मुलाच्या आईवडिलांना युक्रेनमध्येच राहावं लागणार होतं. मात्र गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांना आपल्या मुलाच्या हातात एक पत्र देऊन त्याला देश सोडण्यासाठी बाहेर पाठवलं.

युद्धानं काय केलं पाहा! आई-वडिलांशी ताटातून, देश सोडण्यासाठी चिमुरड्याचा ओक्साबोक्शी रडत 1400 KM प्रवास
11 वर्षांच्या मुलाचा हृदय हेलावून टाकणारा प्रवासImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 6:17 PM

युक्रेन : एक 11 वर्षांचा मुलगा घरातून निघाला. आपल्या आईनं दिलेलं पत्र हातात धरुन या मुलानं तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास केला. प्रवास करत करत हा मुलगा युक्रेनच्या सीमेवर पोहोचला. या प्रवासादरम्यान त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. काळीज पिळवटून टाकेल, असा टाहो सुरु होता. सोबत ना आई होती आणि ना बाबा! या मुलाचा आपलं सामान घेऊन, आईनं दिलेलं पत्र हातात पकडून सुरु झालेला प्रवास युक्रेनच्या सीमेपर्यंत (Ukraine Border) येऊन पोहोचला. रशियानं केलेल्या आक्रमणानं एका मुलाची त्याच्या आईवडिलांपासून (Parents) ताटातूट होणं, ही अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून घराबाहेर पडलेला आणि युक्रेन देश सोडण्यासाठी प्रवास सुरु केलेल्या या मुलाची गोष्ट काळीज पिळवटून टाकणारी आहे. या घटनेमुळे युद्धाचे (Ukraine Russia War) पडसाद किती खोलवर उमटतात, हे देखील अधोरेखित झालंय.

अत्यंत वेदनादायी

युक्रेनच्या झेपुरुझाया शहरात राहणाऱ्या एका निरागस मुलासोबत अत्यंत वेदनादायी अशी घटना घडली. हा मुलगा एकटाच युक्रेन देश सोडण्यासाठी घरातून निघाला होता. या मुलाच्या हातात त्याच्या आईनं एक पत्र दिलं होतं. सीएनएननं याबाबतचा एक व्हिडीओही जारी केला आहे.

सीएनएननं जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये हा मुलगा एकचा ओक्साबोक्शी रडत चालतोय. त्याच्या पाठीवर एक दप्तर आहे. आपलं सामान घेऊन हा मुलदा देश सोडण्यासाठी निघालाय. या प्रवासात त्याच्यासोबत कुणीही नाही. एकटेपणानं कावराबावरा झालेला हा मुलगा रशिया-युक्रेन युद्धामुळे बेघर झालाय. आपल्या आई-वडिलांपासून दूर तो देश सोडण्यासाठी चालतच युक्रेनच्या सीमेवर जाण्यासाठी प्रवास करत होते.

सुदैवानं तो सुखरुप

युक्रेन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा चालत चालत स्लोवाकीआमध्ये सुखरूप पोहोचला आहे. रशियानं सुरु केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमधील अनेक नागरिकांना देश सोडलाय. अनेक जण देश सोडून पळ काढत आहेत. हवाई हल्ले आणि गोळीबाराच्या घटना सुरु असतानाच लोकांनी देश सोडण्यासाठी आपलं घरदार सोडून युक्रेनच्या सीमेच्या दिशेनं धाव घेतली होती. हा मुलगा देखील अशाच लोकापैकी एक होता. हा मुलगा अखेर हजारो किलोमीटरचा प्रवास करुन स्लोवाकिया इथं पोहोचला हा मुलगा सुरक्षित ठिकामी पोहोचला असून तो सुखरुप असल्याची माहिती जारी करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –

आपल्या निरागस आणि गोड हास्यानं त्यानं सगळ्यांना आकर्षित केलं होतं. या मुलाच्या आईवडिलांना युक्रेनमध्येच राहावं लागणार होतं. मात्र गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांना आपल्या मुलाच्या हातात एक पत्र देऊन त्याला देश सोडण्यासाठी बाहेर पाठवलं. हा मुलगा एकटाच प्रवास करत पायी युक्रेनच्या सीमेच्या दिशेनं निघाला होता. स्लोवाकियामध्ये पोहोचलेल्या या मुलाकडे एक प्लास्टिक बॅक, पासपोर्ठ आणि एक फोन नंबर त्याच्या हातावर लिहिलेला असल्याचं आढळून आलं.

याच माहितीच्या आधारे त्यांच्या कुटुंबीयांना काही स्वयंसेवकांनी संपर्क साधला. त्यानंतर या मुलाला आता त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केलं जाणार आहे. जवळपास 15 लाख लोकांनी युक्रेन देश अवघ्या दहा दिवसांत सोडलाय. यातील जवळपास 10 लाख लोक हे एकट्या पोलंडमध्ये गेले आहे.

संबंधित बातम्या :

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर टाकला 500 किलोचा बॉम्ब, युक्रेनच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा

आठवड्याभरात रशियाच्या दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा युक्रेनचा दावा, अधिका-यांनी युद्धात बजावली होती महत्त्वाची भूमिका

Russia Ukraine War : यूक्रेनच्या पाटलाची तऱ्हा न्यारी, मायदेशी जाईन तर बिबट्या आणि पँथरसह!, भारत सरकारसमोर पेच

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.