AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्याभरात रशियाच्या दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा युक्रेनचा दावा, अधिका-यांनी युद्धात बजावली होती महत्त्वाची भूमिका

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच युक्रेनच्या काही महत्त्वाची स्थळ रशियाने ताब्यात देखील घेतली आहेत.

आठवड्याभरात रशियाच्या दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा युक्रेनचा दावा, अधिका-यांनी युद्धात बजावली होती महत्त्वाची भूमिका
विताली गेरासिमोवImage Credit source: google
| Updated on: Mar 08, 2022 | 12:03 PM
Share

युक्रेनने (ukraine) रशियाच्या (russia) दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा केला आहे. आत्तापर्यंत अधिका-यांनी अनेक युद्धात (war) युक्रेनला चांगली मदत केली होती. पण रशियाने आत्तापर्यंत मृत्यूबाबत कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही त्यामुळे अजूनही साशंकता आहे. सदर माहिती युक्रेनच्या रक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली असून युद्धात मेजर जनरल विताली गेरासिसोव या रशियन अधिका-यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या आठवड्यात दोन महत्त्वाचे अधिकारी मारले असल्याचे युक्रेनने सांगितले आहे. याच्या आगोदर युक्रेनकडून एंड्री सुखोवेत्स्की या देखील अधिका-यांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही देशामधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत विताली गेरासिमोव ?

  1. विताली गेरासिसोव यांचा जन्म 9 जुलै 1977 साली रशियातल्या कजान शहरात झाला. तिथंचं जवळ असलेल्या कजान हायर टैंक कमांडमधून त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण पुर्ण केलं.
  2. मेजर जनरल विताली हे रशियाचे 41 वे आर्मी चीफचे कर्मचारी होते. विताली गेरासिसोव हे ४१ व्या आर्मीचे पहिले डिप्टी कंमाडर देखील राहिलेले आहेत.
  3. विटाली गेरासिमोव्ह यांना उत्तर कॉकस, पूर्व, दक्षिण आणि मध्य लष्करी जिल्ह्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. तो प्लाटून कमांडरपासून 41व्या लष्कराच्या चीफ ऑफ स्टाफपर्यंत पोहोचला.

युद्धात महत्त्वाची भूमिका

  1. 1999 ते 2009 या काळात रशियाने चेचन्यासोबत दुसरे युद्ध केले. 10 वर्षे चाललेल्या या युद्धात अखेर रशियाचा विजय झाला. या युद्धात मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  2. चेचन्याशिवाय गेरासिमोव्ह यांनी सीरियात रशियन सैन्याच्या कारवाईतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मार्च 2014 मध्ये क्राइमिया रशियाला जोडण्यात त्याची भूमिका होती.
  3. युक्रेनियन मीडियाचा दावा आहे की मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना रशियन सरकारने 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केल्याबद्दल पदक देऊन सन्मानित केले होते.

रशियाचे 11 हजार सैनिक मारल्याचा दावा

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच युक्रेनच्या काही महत्त्वाची स्थळ रशियाने ताब्यात देखील घेतली आहेत. युक्रेनने सुध्दा रशियाचे दोन महत्त्वाचे अधि-यांसहीत 11 हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांचं युध्दात अधिक नुकसान झालं असून त्याचाी जाणीव दोन्ही देशांना असेल अधिक नुकसान युक्रेनचं झालं असून युक्रेनमध्ये लोक भीतीखाली आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर अनेक ठिकणी इमारती कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी बॉम्बच्या हल्ल्याने रस्ते उद्वस्त झाले आहेत. आत्तापर्यंत अनेक लोकांनी देश देखील सोडला आहे.

कामावर रुजू झाल्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, एसटीचं गोपनीय पत्रं उघड, पडळकर, खोतांकडून पत्राची होळी

कोण आहेत राहुल कनाल, ज्यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकलीय? आदित्य ठाकरेंशी कनेक्शन?

Russia Ukraine War Live : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या हल्ल्यात दुसरा अणु प्रकल्प उद्ध्वस्त

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.