AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीचा फिवर उतरला, महाराष्ट्र भाजपात वेगवान घडामोडी, पराभव झालेल्या पुण्यात मोठा प्लॅन?

पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार की भाजपा पुन्हा त्याच नेतृत्वाला संधी देणार, यावरून चर्चा सुरु आहे.

होळीचा फिवर उतरला, महाराष्ट्र भाजपात वेगवान घडामोडी, पराभव झालेल्या पुण्यात मोठा प्लॅन?
Image Credit source: social media
| Updated on: Mar 08, 2023 | 9:42 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे : विदर्भात विधान परिषद निवडणूक आणि कसब्यातील (Kasba) विधानसभा पोट निवडणुकीत (Election) दारूण पराभव झालेल्या भाजापात येत्या काही दिवसात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन दिवस होळी आणि धुळवडीच्या उत्सवात भाजप नेत्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. राज्यातील राजकारणात काही नवी समीकरणं दिसू शकतात, याबद्दल मोठे सूतोवाचदेखील झाले. त्यातच आता पुण्यातील भाजपात सर्वाधिक बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना हटवण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून केली जातेय.

पुण्यात मोठे फेरबदल

कसबा निवडणुकीत सर्वच दिग्गजांना प्रचाराच्या मैदानात उतरवल्यानंतरही भाजपाला हार पत्करावी लागली. यामुळे भाजापचं नेतृत्व आगामी प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणार असं दिसतंय. पराभवाच्या कारणांवर भाजपात विचारमंथन सुरु आहे. तर या महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारीणीत बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार की भाजपा पुन्हा त्याच नेतृत्वाला संधी देणार, यावरून चर्चा सुरु आहे. भाजापात शहर, जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे महिना अखेरीस पुण्यात नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाव चर्चेत आहेत.

नवा शहराध्यक्ष मिळणार?

पुण्यात सध्या जगदीश मुळीक हे शहराध्यक्ष आहेत. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांन केली होती. मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. मुळीक यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी एका गटाने आधीपासूनच लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी सोशल मीडियातूनच ही मागणी केली होती. त्यामुळे भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. शहराध्यक्ष हटवल्याशिवाय महापालिका जिंकणे अवघड आहे, असा सूर उमटला होता. आता कसब्यातील पराभवानंतर भाजप नेतृत्व यावर गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील भाजपात मोठे फेरबदल दिसून येऊ शकतात.

राज्यातही भाजपचे चेहरे बदलणार?

राज्यातील इतर शहरांतील भाजपच्या नेतृत्वातदेखील मोठे बदल होण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काही ठिकाणचे जिल्हाध्यक्ष बदलतील तर काही ठिकाणचे शहराध्यक्ष बदलतील. योग्य नेत्याकडे योग्य जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.