AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिव्हायडरवर आदळली, 2-3 वेळा उलटली, तवेरा गाडीचा भीषण अपघात,  1 ठार, तिघे जखमी, कुठे घडली घटना?

दुभाजकावरच कार आदळल्याने रस्त्याच्या मधोमध ही भीषण घटना घडली. त्यामुळे नांदेसर चौफुलीजवळील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.

डिव्हायडरवर आदळली, 2-3 वेळा उलटली, तवेरा गाडीचा भीषण अपघात,  1 ठार, तिघे जखमी, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 08, 2023 | 8:58 AM
Share

उमेश परीक, नाशिक | धुळवडीच्या  दिवशीच रात्रीच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यात (Yeola Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी तवेरा गाडी डिव्हायडरवर आदळली. यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला. तर तिघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी रुग्णांवर येवल्यातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच काहींना पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारमध्ये एकूण 8 प्रवासी असल्याची माहिती हाती आली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे ती 2 ते 3 वेळा पलटी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सागितलं.

कुठे घडली घटना?

मंगळवारी मध्यरात्रीनंतर अहमदनगर-मनमाड महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या महामार्गावरील येवल्यातील नांदेसर चौफुलीजवळ ही घटना घडली. सदर तवेरा गाडी कोपरगाव येथून निघाली होती. कोपरगावहून मालेगाव येथे जात असताना हा अपघात झाला. या तवेरा गाडीत 8 जण प्रवास करत होते. अपघातातील सर्वचजण मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे.

2-3 वेळा पलटी

येवल्यातील अपघातावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर आदळली. भरधाव वेगात असल्याने गाडी 2 ते 3 वेळा उलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अपघात होताच रस्त्यावरील इतर वाहने मदतीसाठी धावले. त्यांनी तत्काळ पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.

येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार

हा अपघात घडल्याची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

वाहतूक काही काळ खोळंबली

दुभाजकावरच कार आदळल्याने रस्त्याच्या मधोमध ही भीषण घटना घडली. त्यामुळे नांदेसर चौफुलीजवळील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही वेळातच अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला करण्यात आले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?