AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसबा पेठेत घरातूनच उमेदवारी मिळणार? शैलेश टिळकांचं नाव चर्चेत, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं….

चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.. मग घरातलाच उमेदवार उभा राहणार का?

कसबा पेठेत घरातूनच उमेदवारी मिळणार? शैलेश टिळकांचं नाव चर्चेत, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं....
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 23, 2023 | 1:01 PM
Share

योगेश बोरसे, पुणेः पुण्यातील  (Kasba Peth) पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार (BJP Candidate) कोण असेल याकडे कसबा पेठराज्याचं लक्ष लागलं आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपा आता मुक्ता टिळक यांच्या घरातूनच उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. भाजप नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आज कसबा पेठेतील पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी घरातून उमेदवारीवर चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप घरातून उमेदवारी देणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. भाजपा घरातून उमेदवार देत नाही, असं कोण म्हणालं.. असा प्रति सवाल त्यांनी केला. त्यामुळे घरातून उमेदवार उभा केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.

मग घरातलाच उमेदवार देणार?

चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.. मग घरातलाच उमेदवार उभा राहणार का? यावरून मात्र चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा उमेदवार ठरण्याची नेमकी प्रक्रिया काय असते हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं.

अशा वेळी भाजपच्या तीन प्रमुख समित्या काम करतात. पुण्यातून दिल्लीत तीन नावांची शॉर्टलीस्ट पाठवली जाते. त्यानंतर दिल्लीतून भाजपाचा उमेदवार ठरतो. गल्लीत काय घोषणा द्यायच्या, तेही दिल्लीत ठरतं. त्यामुळे कसबा पेठेतील उमेदवाराचा निर्णय दिल्लीतून ठरेल, असं पाटील यांनी स्पष्ट सांगितलं…

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘ आमच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही तयारीला लागलो आहोत. कसब्यातील कार्यालयातून पुढील बैठका होतील. गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक होईल. निवडणुकीसाठी तीन समित्या केल्या आहेत. राजकीय समितीत माधुरी मिसाळ प्रमुख असतील. संघटनात्मक समितीत राजेश पांडे प्रमुख असतील तर निवडणूक संचालन समितीत २० डिपार्टमेण्ट असतील. मतांचं मार्जिन कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पिंपरी चिंचवडसाठी बैठक कधी?

कसबा पेठेप्रमाणेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी यासंदर्भातील बैठक घेतली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ