पंकजा मुंडे यांना खुली ऑफर!; रावसाहेब दानवे म्हणाले, त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या, त्यांचा मान….

Raosaheb Danve on Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना पक्षांतरासाठी ऑफर; दानवे यांचं परखड भाष्य, म्हणाले त्यांचा मान...

पंकजा मुंडे यांना खुली ऑफर!; रावसाहेब दानवे म्हणाले, त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या, त्यांचा मान....
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:52 AM

मावळ,पुणे : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षांतरासाठी खुली ऑफर देण्यात आली आहे. बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचं सुचवलं आहे. शिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही पंकजा मुंडे यांना आलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि मी भाजपचा फाउंडर मेंबर आहे. फक्त बीआरएसच नाही तर राष्ट्रवादीने देखील त्यांना ऑफर दिली आहे. काँग्रेसने देखील दिली आहे. पण पंकजा मुंडे या सच्चा भाजपच्या नेत्या आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. भाजपच्या त्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांचा योग्य मानसन्मान त्यांना दिला जातो. त्यामुळे त्या कुठेही जाणार नाहीत, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

लहानतोंडी मोठा घास अशी सध्या विरोधकांची अवस्था आहे. त्यांची क्षमता किती, बोलतात किती? याचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे. जनतेच्या हितासाठी तो वापरला पाहिजे असं कोर्टाने सांगितले होतं, असं म्हणत पीएम केअर फंडवर दानवेंनी भाष्य केलंय.

सध्या राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. अजित पवार यांनी पक्ष पातळीवर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावर प्रश्न विचारला असता. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असं रावसाहेब दानवे म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाने इतका मोठा गुन्हा केला तर पुढे काहीतरी अजून मोठ बाहेर येईल. आमच्याकडून असे काही गुन्हे घडत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना काही मिळणार नाही आणि काही मिळालं असेल त्यांना तर त्यांनी ते उघड करावं, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.

यंदा कांद्याला योग्य भाव मिळाला नाही. त्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली तर भाव कोसळतात, हे खरं आहे. शेतकऱ्याला भाव मिळाला नाहीये. सरकारने कांद्याला अनुदान दिलं. कांद्याचे उत्पादन जास्त झालं आहे. अनुदान मिळालं नसेल तर आम्ही सरकारला सांगून अनुदान मिळवून देऊ आणि त्यांच्या खात्यात ते जमा करू, असा शब्द रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता, शरद पवारांची कबुली
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता, शरद पवारांची कबुली.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.