
पुणे : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहतायत. मुंबई महापालिकेनंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिक ही पुण्याची आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
वार्ड क्रमांक 7 (अ) अनुसूचित जाती
वार्ड क्रमांक 7 (ब) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 7 (क) सर्वसाधारण
व्याप्ती – कल्याणीनगर, आगाखान पॅलेस, पंचशील वॉटर फ्रंट, सलीम अली पक्षी अभयारण्य, जनतानगर, नवी खडकी, शास्त्रीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, संजय पार्क, एअरफोर्स एरिया, त्रिदलनगर सोसायटी इ.
प्रभाग क्रमांक 7मध्ये एकूण लोकसंख्या 67739 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 14154 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 633 इतकी आहे.
प्रभाग – 7 गेल्या निवडणूकीमध्ये वाकडेवाडी प्रभागामध्ये गट – अ याठिकाणी लांडगे सोनाली संतोष या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्यात. प्रभागामध्ये गट – ब याठिकाणी काळे राजश्री ज्ञानेश्वर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्या. गट क याठिकाणी माळवे आदित्य अनिल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत. गट ड याठिकाणी भोसले रेश्मा अनिल या अपक्ष उमेदवार निवडणून आल्या होत्या.
वार्ड क्रमांक सात (अ)मध्ये संतोष सोनाली लांडगे या भाजपच्या उमेदवार निवडणून आल्या. त्यांना 11150 मते मिळाली होती. शिवसेनेच्या कांबळे वनमाला प्रमोद यांना 5688 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मोरे रुपाली श्रीपाद यांना 8502 मते मिळाली. 1571 मते मनसेचे उमेदवार रणदिवे जयश्री महादेव यांना मिळाली. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या उमेदवार साने आशा राजेश यांना 7238 मते मिळाली.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | संतोष सोनाली लांडगे | संतोष सोनाली लांडगे |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | मोरे रुपाली श्रीपाद | |
| मनसे | रणदिवे जयश्री महादेव | |
| नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | साने आशा राजेश | |
| शिवसेना | कांबळे वनमाला प्रमोद |
भवारी सुरेखा नागेश (शिवसेना) 7194
चव्हाण धनश्री चंद्रकांत (राष्ट्रवादी) 7882
काळे राजश्री ज्ञानेश्वर (भाजप) 14488
रोकडे नंदा रमेश (काँग्रेस) 9265
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | भवारी सुरेखा नागेश | भवारी सुरेखा नागेश |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | रोकडे नंदा रमेश | |
| भाजप | काळे राजश्री ज्ञानेश्वर | |
| नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | चव्हाण धनश्री चंद्रकांत |
ओरसे विनोद चंदू (शिवसेना) 8282
ओरसे रविंद्र शंकर (राष्ट्रवादी) 7993
माळवे आदित्य अनिल (भाजप) 11561
शिंदे छाया समाधान (काँग्रेस)7298
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ओरसे विनोद चंदू | |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | शिंदे छाया समाधान | |
| भाजप | माळवे आदित्य अनिल | माळवे आदित्य अनिल |
| नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ओरसे रविंद्र शंकर |
भोसले रेश्मा अनिल (अपक्ष) 14165
निकम हरिष प्रभाकर (शिवसेना) 5140
निकम निलेश नारायण (राष्ट्रवादी) 7534
बहिरट दत्ता (काँग्रेस)11245
आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.