PMC Election Ward 3 Vimannagar| प्रभाग तीनमध्ये भाजप, राष्ट्रवादीत चुरस; यंदा बाजी कोण मारणार?

गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाली. मात्र चारही ठिकाणी भाजपाचेच उमेवार विजयी झाले. यंदा देखील राष्ट्रवादी आणि भाजपामध्येच मुख्य लढत असणार आहे.

PMC Election Ward 3 Vimannagar| प्रभाग तीनमध्ये भाजप, राष्ट्रवादीत चुरस; यंदा बाजी कोण मारणार?
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:59 AM

पुणे : विविध राजकीय पक्षांकडून पुणे महापालिका निवडणुकीची (PMC election 2022) तयारी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका (municipal election 2022) होणार आहेत. यामध्ये पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. सध्या पुणे महापालिकेत भाजपाची (BJP) सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चुरस पहायला मिळू शकते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे महापालिका निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच दोन्ही पक्षातील इतर नेत्यांच्या देखील पुण्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पुणे महापालिका यंदा कोण काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक तीन बाबबत बोलयाचे झाल्यास गेल्या महापालिका निवडणुकीत या वार्डामधून भाजपाने एक हाती सत्ता मिळवली होती. वार्ड क्रमांक अ, ब, क आणि ड अशा चारही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक तीनमध्ये एकूण लोकसंख्या 61836 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 8592 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 727 इतकी आहे.

वार्ड क्रमांक अ

प्रभाग क्रमांक तीन विमाननगर-सोमनाथनगरमधील वार्ड क्रमांक अ मध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस पहायला मिळाली होती. या वार्डातून भाजपाचे उमेदवार राहुल भंडारे हे विजयी झाले त्यांना एकूण 12871 मते पडली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद सरवदे यांचा पराभव केला. आनंद सरवदे यांना एकूण 9451 मते पडली. तर शिवसेनेचे उमेदवार भिमराव खरात यांना 3875 मते पडली. काँग्रेसचे उमेदवार रमेश सकट यांना 3005 आणि मनसेचे उमेदवार निलेश गायकवाड यांना एकूण 771 मते पडली.

हे सुद्धा वाचा

वार्ड क्रमांक अ मधील उमेदवार

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेनाभिमराव खरात-
भाजपराहुल भंडारेराहुल भंडारे
काँग्रेसरमेश सकट -
राष्ट्रवादी आनंद सरवदे -
मनसेनिलेश गायकवाड -
इतर/ अपक्ष --

वार्ड क्रमांक ब

वार्ड क्रमांक ब मध्ये देखील राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच चुरस पहायला मिळाली. या वार्डामधून देखील भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्या. भाजपा उमेदवार श्वेता गलांडे यांना 12389 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवार उषा कळमकर यांना एकूण 11144 मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार संध्या खेडकर यांना 3074, काँग्रेसच्या उमेदवार कविता शिरसाट यांना 360, तर अपक्ष उमेदवार लता मेरगळ यांना एकूण 591 मते मिळाली.

वार्ड क्रमांक ब मधील उमेदवार

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेनासंध्या खेडकर -
भाजपश्वेता गलांडेश्वेता गलांडे
काँग्रेस कविता शिरसाट-
राष्ट्रवादीउषा कळमकर -
मनसे--
अपक्ष/ इतर लता मेरगळ-

वार्ड क्रमांक क

वार्ड क्रमांक क मध्ये देखील भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच लढत होती. या वार्डामध्ये भाजपाच्या उमेदवार मुक्ता जगताप यांनी 12884 मते घेत विजयी मिळवला तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुरेखा खांदवे यांना 8470 मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार वैशाली चांधेरे यांना 4340, काँग्रेसच्या उमेदवार सागरताई रोडगे यांना 3344, भारीपच्या रेखाताई बनसोडे यांना 1230 मते मिळाली.

वार्ड क्रमांक क मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना वैशाली चांधेरे-
भाजपामुक्ता जगतापमुक्ता जगताप
काँग्रेससागरताई रोडगे-
राष्ट्रवादी सुरेखा खांदवे-
मनसे--
इतर/ अपक्ष रेखाताई बनसोडे-

वार्ड क्रमांक ड

वार्ड क्रमांक ड मध्ये सुद्धा भाजपानेच बाजी मारली. वार्ड क्रमांक ड मध्ये भाजपाचे उमेदवार बापूराव कर्णे हे विजयी झाले. त्यांना एकूण 13105 मते पडली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आढाव याचा पराभव केला. रमेश आढाव यांना एकूण 8705 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार प्रितम खादवे यांना 4167 तर काँग्रेसचे उमेदवार भुजंग लव्हे यांना 2932, मनसेचे उमेदवार मोहनराव शिंदे यांना 635 आणि बहुजन समाज पार्टीच्या राहूल बोडरे यांना एकूण 866 मते पडली.

वार्ड क्रमांक ड मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाप्रितम खादवे-
भाजपाबापूराव कर्णे बापूराव कर्णे
काँग्रेस भुजंग लव्हे -
राष्ट्रवादी रमेश आढाव-
मनसेमोहनराव शिंदे-
इतर/ अपक्ष --
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.