काँग्रेसची ‘ही’ कृती चुकीची, मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?; राष्ट्रवादी नेत्याचा सवाल

Ankush Kakde on Congress : काँग्रेसच्या 'त्या' कृतीवर राष्ट्रवादीची नाराजी; वरिष्ठ नेत्याची सविस्तर प्रतिक्रिया

काँग्रेसची 'ही' कृती चुकीची, मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?; राष्ट्रवादी नेत्याचा सवाल
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 11:10 AM

पुणे : कर्नाटकात काल काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक विधानसभा शुद्धीकरणावरून राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. अशा पद्धतीने विधानसभा शुद्धीकरण करणं चुकीचं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

ज्या विधनासभेचं शुद्धीकरण केलं त्यात काँग्रेसचेही आमदार बसले होते ना? मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?, असा सवाल अंकुश काकडे यांनी काँग्रेसला विचारला आहे.

काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. त्यांनी अशा पद्धतीने धार्मिक विधी करणं चुकीचं आहे. विधानसभा शुद्धीकरण करणं मला अयोग्य वाटलं. मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय राहिला? यावर काँग्रेसच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे, असं काकडे म्हणालेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला 22 वर्षांनंतर बहुमत मिळालं. त्यानंतर सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पडला. यात डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झालेत.

काल नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विधानभवनाचं शुद्धीकरण केलं. गोमुत्र शिंपडत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधिमंडळाचं शुद्धीकरण केलं आहे.

काँग्रेसकडून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप

याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात डी के शिवकुमार यांनी या गोमुत्र शुद्धीकरणाचा उल्लेख केला होता. आता कर्नाटक विधानसभेची गोमुत्राने शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यानंतर काल काँग्रेसकडून शुद्धीकरण करण्यात आलं. त्यावर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे.

निवडणुकीच्या काही दिवस आधी 5 मेला कर्नाटक काँग्रेसने तत्कालीन भाजप सरकारच्या कामकाजावर बोट ठेवलंय. भाजपने घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यासाठी त्यांनी ‘करप्शन रेट कार्ड’ आणलं. हे कार्ड इंग्लिश आणि कन्नड या दोन भाषांमध्ये सादर केलं गेलं. तत्कालीन भाजप सरकारने दीड कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी 20 मेला पार पडला. बंगळुरुमधल्या कांतेराव स्टेडियमवर हा सोहळा पार पडणार आहे. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तर डी के शिव कुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या दोघांसह डॉ. जी परमेश्वरा, के एच मुनीयाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतिश जारकिहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी, बी झेड जमीर अहमद खान या आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.