AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant Attack : उदय सामंत हल्लाप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्लाप्रकरणात आता पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंना अटक करण्यात आली आहे.

Uday Samant Attack : उदय सामंत हल्लाप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक
सर्वोच्च नायालयातील सुनावणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया
| Updated on: Aug 03, 2022 | 8:34 AM
Share

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात (PUNE) मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारीच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. आता उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वहानाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘आमच्या संयमाचा अंत पाहू नका’

दरम्यान या हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असा होत नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी हल्ल्यानंतर दिली आहे. तर हल्लेखोरांना सात ते आठ दिवसांत उत्तर मिळेल असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक