शिर्डीत विखे-थोरात पुन्हा वाद, स्टार प्रचारकाचा फोटो हटवला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

शिर्डी : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिर्डी मतदारसंघातील श्रीरामपूर इथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बॅनरवरुन विखेंचा फोटो गायब होता. विखे समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत. पण विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना थोरातांची साथ मिळाल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पण या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी […]

शिर्डीत विखे-थोरात पुन्हा वाद, स्टार प्रचारकाचा फोटो हटवला
Follow us on

शिर्डी : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिर्डी मतदारसंघातील श्रीरामपूर इथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बॅनरवरुन विखेंचा फोटो गायब होता. विखे समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत. पण विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना थोरातांची साथ मिळाल्याचं चित्र आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पण या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला गटबाजीचं ग्रहण लागलंय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो बॅनरवरुन गायब करण्यात आलाय. काँग्रेसचे स्टार प्रचारक असतानाही त्यांचा फोटो डावलल्याने थोराट गटावर विखे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना दक्षिण नगरची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात लढत होत आहे.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर थोरातांनी थेट राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्यामुळे विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेला आहे. थोरातांकडून विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना विखेंकडूनही थोरातांच्या राजकारणाला शह दिला जातोय. मात्र या दोघांच्या राजकारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत सापडल्या आहेत.

संबंधित बातम्या

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसला मदत नाही, विखे समर्थकांचा पवित्रा 

धानोरकरांना तिकीट ते विखे-थोरात वाद, काँग्रेसमधील धुसफुशीची 7 कारणे  

नगरमध्ये संग्राम जगतापांना धक्का, काँग्रेसचा सुजय विखेंना पाठिंबा  

महाराष्ट्रातील सर्वात रोमहर्षक लढत, तीन घराणे, तीन तरुण आणि एक जागा!