Rahul Gandhi On Sharad Pawar: ‘शरद पवारांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर…’, राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय
इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका मांडल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचे स्थान काय? याबाबत आता राहुल गांधी यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Rahul Gandhi On Sharad Pawar NCP: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका मांडल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचे स्थान काय? याबाबत आता राहुल गांधी यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
“भारतीय जनता पक्षाला आम्ही मतचोरीवरुन घेरले, त्यानंतर त्यांनी आता डिलिमिटेशनच्या माध्यमातून निवडणुका चोरण्याचा नवा मार्ग शोधला आहे. देशातील 80 टक्के लोकांचा विश्वास आहे की भाजप निवडणुका चोरते. त्यामुळेच या विधेयकाला आमचा विरोध आहे. मात्र शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांचे इंडिया आघाडीमधील स्थान बदलणार नाही. त्यांचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार आहे,” असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत. “डिलिमेटशनच्या माध्यमातून ते 850 जागांवर त्यांना कुठे रंग भरायचे आहेत ते त्यांच्या मताने भरतील. यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. असाच त्यांचा प्लॅन आहे. 850 हा लोकशाहीची हत्या करणारा आकडा आहे. हाच आकडा भारतातील लोकशाही संपवणार आहे, डिलिमिटेशनमुळे 2051 पर्यंत मतदारसंघ फ्रीज केले जातील,” असा घणाघात त्यांनी केला.
शरद पवार यांच्या भूमिकेवरुन टीका…!
दरम्यान, “शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे बाप-लेकींनी घरात बसून निर्णय घेतला. सत्तेसाठी जगायचे अन् सत्तेसाठी मरायचे हेच शरद पवार यांच्या डोक्यात आहे, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टिका केली होती. दुसरीकडे, या देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही विधेयकाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्र माफ करणार नाही,” असं म्हणत संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्या भूमिकेवरुन टीका केली होती.