AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Speech : ‘…तर सभेच्या गर्दीत चिरडून मराल’, सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर

मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही सभा उधळायला याल तर आम्ही तुम्हाला मारण्याची गरज नाही. ही गर्दीच तुम्हाला चिरडून टाकेन, थेट इशारा जाधव यांनी दिलाय.

Raj Thackeray Speech : '...तर सभेच्या गर्दीत चिरडून मराल', सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर
अविनाश जाधव, मनसे नेतेImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 01, 2022 | 2:56 PM
Share

औरंगाबाद : राज्यात हिंदुत्वावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची मोठी कोंडी करत आहेत. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा आज औरंगाबादेत होत आहे. राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, राज ठाकरे यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा काही संघटनांनी दिलाय. भीम आर्मीच्या (Bhim Army) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना संविधान भेट देणार असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन केल्यास सभा उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिलाय. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी या संघटनांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही सभा उधळायला याल तर आम्ही तुम्हाला मारण्याची गरज नाही. ही गर्दीच तुम्हाला चिरडून टाकेन, थेट इशारा जाधव यांनी दिलाय.

भीम आर्मी आणि अन्य काही संघटनांनी राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिलाय. त्याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता, संविधानाचं स्वागतच आहे. मात्र, सभा उधळून लावण्याच्या धमक्या किंवा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आम्ही मारण्याची गरज नाही. तुम्ही या सभेत चिरडून मराल, असा इशाराच त्यांनी दिलाय. त्याचबरोबर तुम्ही विरोध करत असाल तर पुढील सभा आम्हाला तुमच्या घरासमोर घ्यावी लागेल, असंही जाधव म्हणाले.

भीम आर्मीचे अशोक कांबळे पोलिसांच्या ताब्यात

भीम आर्मीकडून राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे जाणार होते. भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईवरुन औरंगाबादच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देणार होते. राज ठाकरे संविधान मानत नाहीत. त्यामुळे त्यांनी संविधान भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे.

भोंगे, हिंदुत्वावरून राज ठाकरे आक्रमक भूमिका मांडणार?

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अगदी शेवटच्या वेळी अटीशर्थींसह परवानगी दिलीय. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या सभेसाठी 16 अटी घातल्या आहेत. असं असलं तरी राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. तसंच मशिदींवरील भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक भूमिका मांडण्याची शक्यता आहे. संपुर्ण महाराष्ट्राला राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता लागली आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान