“आत्मचरित्राची पानं वाढली”, ‘एमएसईबी’ कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

| Updated on: Aug 30, 2020 | 11:13 AM

पुण्यातील शिरुरमध्ये असलेले 'एमएसईबी'चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

आत्मचरित्राची पानं वाढली, एमएसईबी कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन
Follow us on

पिंपरी चिंचवड : वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करताना ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक करताना “आत्मचरित्राची पानं वाढली” असे उद्गार राज ठाकरेंनी काढले. (Raj Thackeray calls Shirur MNS Volunteer who protest at MSEB office against excessive electricity bill)

पुण्यातील शिरुरमध्ये असलेले ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. बारा दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर राज ठाकरे यांनी मनसैनिक सुशांत कुटे यांना फोन केला.

काय झाला संवाद?

राज ठाकरे : जय महाराष्ट्र
सुशांत कुटे : जय महाराष्ट्र, ते आंदोलन झालं, रविवारी सुटलो आम्ही
राज ठाकरे : बरं, चला अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं
सुशांत कुटे : नांदगावकर साहेबांनी खूप मदत केली, घरच्यांना फोन वगैरे केला, सगळ्यांशी बोलले
राज ठाकरे : हो न?
सुशांत कुटे : हो, आणि तुमचंही लक्ष होतं, त्यांनी सांगितलं.. गणपतीमुळे काय भेट नाही झालं
राज ठाकरे : काय त्रास नाही न झाला?
सुशांत कुटे : नाही साहेब, त्रास नाही झाला, बारा दिवस लागले तिथे फक्त
राज ठाकरे : हा ते ठीक आहे, आत्मचरित्राची पानं वाढली
सुशांत कुटे : हाहाहा, तुमचा आशीर्वाद आहे साहेब. बाकी काय
राज ठाकरे : शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना
सुशांत कुटे : गणपती झाल्यावर भेटायला येतो
राज ठाकरे : हो या

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक झाली आहे. राज्याच्या अनेक भागात मनसेने आंदोलन छेडले आहे. कुठे वीज वितरणाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे, तर कुठे फलकांना काळे फासण्यात आले आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेने खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना सुनील यांचे बंधू अनिल ईरावर यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

संबंधित बातम्या :

मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन, भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

(Raj Thackeray calls Shirur MNS Volunteer who protest at MSEB office against excessive electricity bill)