मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन, भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

राज ठाकरे यांनी सुनील यांचे भाऊ अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले. काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला दिला.

मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन, भावाच्या अश्रूंचा बांध फुटला
फोटोमध्ये मध्यभागी अनिल ईरावर, उजवीकडे सुनील ईरावर
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 8:43 AM

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांच्या आत्महत्येने खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना अनिल यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. (Raj Thackeray calls Nanded MNS City President Sunil Irawar Family after his suicide)

राज ठाकरे यांनी सुनील यांचे भाऊ अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले. काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला दिला.

काय झाला संवाद?

राज ठाकरे : हॅलो अनिल ईरावर : हॅलो, अनिल बोलतोय राज ठाकरे : जय महाराष्ट्र, राज ठाकरे बोलतोय अनिल ईरावर : जय महाराष्ट्र साहेब, साहेब तुमचा वाघ गेला… खूप प्रेम करायचा तुमच्यावर… राज ठाकरे : पण काय झालं त्याला अचानक? अनिल ईरावर : हसत-खेळत होता, काहीच कल्पना नाही, घरी भांडण नाही राज ठाकरे : मग काय झालं त्याला? अनिल ईरावर : अचानकच, कोणतं टेन्शन होतं काय माहिती राज ठाकरे : कसलं टेन्शन? माझ्याशी बोलायचं तरी. अनिल ईरावर : मला खूप वेळा बोलला, साहेबांना भेटलो माझी किस्मत मोठी आहे, खूप भाग्यवान आहे. राज ठाकरे : घरी कोण कोण असतं? अनिल ईरावर : आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहतो, चार भाऊ, वहिनी, आताच एन्गेजमेंट झाली होती. राज ठाकरे : काही दिवसांनी मी स्वत: घरी येईन भेटायला, काळजी घ्या

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या मनसेचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. इरावार यांनी शनिवारी 15 ऑगस्टला रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. (Raj Thackeray calls Nanded MNS City President Sunil Irawar Family after his suicide)

अखेरचा जय महाराष्ट्र

“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’

“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील”

“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो.” असे सुनील इरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

“अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरुन जातं..” असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिक सुनील ईरावर यांच्या आत्महत्येनंतर केलं.

संबंधित बातम्या :

“राजसाहेब मला माफ करा” सुसाईड नोट लिहित मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

(Raj Thackeray calls Nanded MNS City President Sunil Irawar Family after his suicide)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.