Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा, मनसेच्या 15 हजार पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस; मनसैनिकांना उचलायला सुरुवात

राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात कलम 116, 117 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राज्यभरातील मनसे जिल्हाध्यक्षांसह 15 हजार मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर पहिल्यांदा हनुमान चालिसा लावलेल्या महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा, मनसेच्या 15 हजार पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस; मनसैनिकांना उचलायला सुरुवात
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 5:28 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवाची शिवतीर्थावरील सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि रविवारच्या औरंगाबादेतील सभेतही राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. तसंच मशिदींवरील भोंगे (Loudspeaker on Mosque) हटवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिलाय. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर आता महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi) आणि गृहमंत्रालयही आक्रमक बनलं आहे. राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात कलम 116, 117 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राज्यभरातील मनसे जिल्हाध्यक्षांसह 15 हजार मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर पहिल्यांदा हनुमान चालिसा लावलेल्या महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण आणि वैयक्तिक टीका केल्या प्रकरणी कलम 116, 117, 153 आणि सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा झाली होती. पोलिसांनी या सभेसाठी एकूण 16 अटी घातल्या होत्या. त्यातील एका अटीत 15 हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, राज यांच्या सभेला 1 लाखा पेक्षा अधिक लोक उपस्थित असण्याचा अंदाज आहे. तसंच राज यांना वैयक्तिक टीका नको अशीही अट घातली होती. मात्र, या दोन्ही अटींसह एकूण 12 अटींचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

मनसे नेत्यांना पोलिसांच्या नोटीस

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता मनसे नेत्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांना 2016 च्या एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. तर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनाही आज पोलिसांनी नोटीस दिली आहे. इतकच नाही तर राज्यभरातील मनसे जिल्हाध्यक्षांसह मनसेच्या 15 हजार मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सर्वात आधी मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली होती. त्या महेंद्र भानुशाली यांना चांदिवली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी भानुशाली यांना आता तुमची पुढील रणनिती काय असं विचारलं असता, साहेब सांगितील त्याप्रमाणे होईल, असं उत्तर त्यांनी दिलं.

सांगलीत राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट!

दरम्यान, सांगलीतील शिराळा कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढले होते. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप त्यावर काही कारवाई केली नव्हती. 28 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आललं यासंबंधीचं पत्र आज समोर आलं असून 2008 सालच्या एका प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे कोर्टासमोर चौकशीसाठी हजर राहतील का, असा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.