AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले…

कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते

बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले...
नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 08, 2023 | 12:23 PM
Share

पुणे : पुण्यात झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर राज ठाकरे (raj thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत व्यंगचित्रावर (caricature)बोलताना आजच्या राजकारणांवर राज ठाकरे यांनी बोट ठेवले. त्यांनी राजकारण्यांनी अनेक व्यंगात्मक फटकारे लागावले. त्याचबरोबर माध्यमांनाही त्यांनी चार गोष्टी सुनावल्या.

मुलाखातीच्या सुरवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी हजर जबाबीपणाने मिश्किलपणे उत्तर दिलं. राज म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही.” या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

व्यगंचित्र कसे शिकले :  आपण व्यंगचित्र वडील आणि बाळासाहेबांकडून शिकलो. बाळासाहेबांनी जे सल्ले दिले त्यानुसार व्यंगचित्र काढत गेलो. सात ते आठ तास अभ्यास करत गेलो. बाळासाहेबांनी सांगितले होते की, जे समोर दिसेल ते काढ. त्यानंतर जे समोर दिसेल ते उतरवत गेलो. मुद्रीत माध्यमांमध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध होण्याची मजा काही तरी वेगळी होती. सोशल मीडियावर ती मजा नाही.

राजकीय परिस्थितीमुळे घंटा वाजतात : राजकीय व्यंगचित्र काढताना समोर चेहरा आले की दिसावे लागते. कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते, अशा षटकार आजच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांनी मारला.

माध्यमांवर राजकीय चर्चा बंद करा : माध्यमांनी महत्वाचे प्रश्न सोडून फक्त राजकारणावर चर्चा होते. राजकारणावर चर्चा बंद करुन राज्यातील शेती, शेतकरी, ग्रामीण भाग आणि तळागळातील लोकांचे प्रश्न मांडायला हवे. पण राऊत काय बोलला आणि पवार काय बोलले, याच बातम्या दिल्या जातात. हे सर्व बंद करायला हवे. ही कोणती पत्रकारिता आहे आपणास कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काय म्हणाले…:  देशातील एखाद्या राज्याला महत्व दिले जात आहे. हे सर्वात आधी मी म्हटले होते. त्यांनी देशाचा विचार करायला हवे. परंतु फक्त गुजरातचा विचार केला जातो. हा प्रश्न सर्वात आधी मी मांडला. त्यानंतर त्यावर शहामृगसारखे झाले.

चांगले ते चांगले : जे चांगले आहे. त्याचे कौतूक करतो. मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवलाय. त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला. त्यामुळे त्याचे कौतूक केले. परंतु जेथे चुकत आहे, तेथे स्पष्ट विरोध केलाय. मी जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणार आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणाणार आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण परिवर्तनशील आहे, हे समजले पाहिजे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?