AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : मनसे नेते औरंगाबादेत, राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, निर्णय उद्या

मनसे नेते राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतल्या सभेला उद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत पोलीस उद्या निर्णय घेणार आहेत. पोलिसांकडून मैदानाची पाहणीही करण्यात आली आहे. औरंगाबादेत सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Raj Thackeray : मनसे नेते औरंगाबादेत, राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, निर्णय उद्या
मनसे नेते औरंगाबादेत, राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाहीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 27, 2022 | 7:24 PM
Share

औरंगाबाद : मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतल्या सभेला उद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत पोलीस उद्या निर्णय घेणार आहेत. पोलिसांकडून मैदानाची पाहणीही करण्यात आली आहे. औरंगाबादेत (Aurangabad Police) सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी औरंगाबादेत दाखल होत त्या मैदानाची पाहणी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात बाळासाहेब नांदगावकर पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. आज रात्री बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि पोलीस कमिशनर  यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत प्रमुख मनसे नेते आणि औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी हजर असतील. अशीही माहिती समोर आली आहे. औरंगाबादेतल्या या सभेवरून सध्या जोरदार चर्चा आहे. राज ठाकरेंनी हनुमान चालीसा आणि हिंदुत्वावरून भूमिका घेतल्यानंतर राज यांच्या या सभेला मोठा विरोधही होताना दिसून आला आहे.

अनेक संघटनांचा विरोध

राज ठाकरेंच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी विविध संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे पोलीसही सध्या सावध पाऊलं उचलताना दिसून येत आहेत. या सभेच्या तयारीसाठी  मनसे नेते बाळा नांदगावकर हेही औरंगाबादेत दाखल झाले आहेत. त्यांनी त्या मैदानाचीही पाहणी केली आहे. तर सभेला नक्की परवानगी मिळेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सर्व आधीकाऱ्याशी चर्चा करणार आणि उद्यापर्यंत निर्णय घेणार अशी माहिती औरंगाबादचे आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे.

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

सभेची तयारी झालेली आहे, सभा छान होईल, पोलिसांच्या परवानगीमुळे काही अडचण होणार नाही. पोलीसांच्या वरती कोणीतरी आसते, त्यामुळे परवानगीला उशीर होतो. कायदा व्यवस्था कशी राखायची ते आम्हाला सांगायची गरज नाही. पोलीसांच्या मनात काय चालले आहे ते आम्हाला काय कळणार? मी मभेच्या तयारीचा आढावा घेणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच सास्कृतिक मैदानाला ईतिहास आहे, म्हणून आम्ही त्या मैदानावर सभा घेत आहे. बाळासाहेबांचा आदर्श राज साहेंबाच्या समोर आहे, तसेच पवार साहेंबावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, राज साहोब यावर बोलणार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. तसेचत जनता हाच मनसेचा भोंगा आहे. दुसऱ्या भोंग्याची आम्हाला गरज नाही. नास्तिक लोक राज साहेबामुळे आस्तिक झाले. नुसत एक मुद्दा राज साहेंबानी घेतला तर एवढे झाले, असेही ते म्हणाले.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी