AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : जेम्स लेनवरुन सुरु असलेल्या वादावरील पडदा राज ठाकरेंनी हटवला! ‘इंडिया टुडे’ने घेतलेल्या मुलाखतीतील प्रश्न-उत्तरं मांडली

जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीतील फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत. ते चार प्रश्न फक्त बघून घ्या, असं म्हणत ठाकरे यांनी जेम्स लेनच्या मुलाखतीतील प्रश्न आणि उत्तरं सांगितली.

Raj Thackeray : जेम्स लेनवरुन सुरु असलेल्या वादावरील पडदा राज ठाकरेंनी हटवला! 'इंडिया टुडे'ने घेतलेल्या मुलाखतीतील प्रश्न-उत्तरं मांडली
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Updated on: May 01, 2022 | 11:25 PM
Share

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळेच महाराष्ट्रात जातीवाद वाढला. त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं, असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार कहीधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा तर आहेच, पण तो आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, असं ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. ज्यावरून दहा पंधरा वर्ष तुम्ही राजकारण केलं तो जेम्स लेन (James Lane) म्हणतो मी कुणालाही भेटलो नाही. तुम्ही केंद्रात होता. का त्याला फरफटत आणलं नाही. कशासाठी हे विष पाजलं. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते. तुम्ही रामदास स्वामींची जात पाहत आहात का? रामदास स्वामी कधी बोलेले मी शिवाजी महाराजांचा गुरु आहे का, शिवाजी महाराज कधी बोलले रामदास स्वामी माझे गुरु आहेत? मग कशासाठी? असा सवाल राज ठाकरे यांनी पवारांना केलाय.

त्याचबरोबर राज ठाकरे यांनी जेम्स लेनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीचा दाखलाही दिला. आता जेम्स लेन… इतकी वर्षे बघा ही माणसं सत्तेत होती, खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला. विचारायचं होतं तुला कुणी सांगितलं हे. त्या जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीतील फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत. ते चार प्रश्न फक्त बघून घ्या, असं म्हणत ठाकरे यांनी जेम्स लेनच्या मुलाखतीतील प्रश्न आणि उत्तरं सांगितली.

राज ठाकरेंनी जेम्स लेनच्या मुलाखतीतील प्रश्नोत्तरं सांगितली

प्रश्न – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अवमानकारक माहिती कुणी पुरवली?

उत्तर – तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कुणीही माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करुन ठेवलंय त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं काय खरं आहे, त्यात मला काहीही सर नाही. पण एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसऱ्या Narrative च्या बाजूने, असं का?

प्रश्न – तुमच्याकडे असलेल्या अवमानकारक माहितीचा आधार काय?

उत्तर – माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्यांच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.

प्रश्न – या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं?

उत्तर – मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही.

प्रश्न – महाराजांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले. ते कशामुळे?

उत्तर – युक्तिवाद करतानाच मी पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला.

पवारांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी

पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. फोटोही लावत नाही. आता फोटो लावत नाही. मी जात मानत नाही. मी ब्राह्मणांची बाजू घेऊन बोलत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांवर हल्ला चढवला.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.