राज ठाकरेंच्या तीन महत्त्वपूर्ण घोषणा, 25 मार्चला पुन्हा 'राज'गर्जना

येत्या 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. याशिवाय राज ठाकरेंनी इतरही अनेक घोषणा केल्या.

Raj Thackeray speech MNS Adhiveshan, राज ठाकरेंच्या तीन महत्त्वपूर्ण घोषणा, 25 मार्चला पुन्हा ‘राज’गर्जना

मुंबई : मनसेच्या महाअधिवेशनाची सांगता राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) हे मनसैनिकांना काय संबोधित करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी केंद्राच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. इतकंच नाही तर येत्या 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. याशिवाय राज ठाकरेंनी इतरही अनेक घोषणा केल्या.

25 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा

माझ्या अधिवेशनासाठी तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली. येत्या 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन आणि 25 मार्चला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा निमित्ताने शिवतीर्थावर जाहीर सभा आयोजित केली. मला जे काही अनेक विषय बोलायचे आहेत ते विषय सुरु करण्याआधी मी दोन तीन संघटनात्मक गोष्टी सांगणार आहे. हे सांगितल्यावर मला तसं पक्षात होताना दिसता कामा नये. असे राज ठाकरे म्हणाले.

मराठीला नखं लावलात तर अंगावर जाईन 

मी मराठी देखील आहे आणि हिंदूही आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. पण मी एक सांगतो माझ्या मराठीला नखं लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन. जर माझ्या धर्माला नखं लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून तुमच्या अंगावर जाईल असेही राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) म्हणाले.

मनसेची शॅडो कॅबिनेट

सरकारमधील जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सरकारच्या खात्यांवर लक्ष ठेवणारं ‘शॅडो कॅबिनेट’ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच घेऊन येणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.

पक्षाच्या संघटना बांधणीसाठी ज्यांना काम करायची इच्छा आहे. त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी. पक्षासाठी काम करायचं आहे, निवडणूक लढवायची नाही असं सांगावं. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येतील असेही राज ठाकरे म्हणाले.

माझ्याकडे काही महत्त्वाची माहिती आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात. ते काय करतात माहिती नाही. कारण तेथे पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही. त्या ठिकाणी काय शिजतंय, काय होणार आहे हे कळत नाही. परंतू मला जे कळलं आहे त्याप्रमाणे तेथे काही तरी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव आतमध्ये शिजतो आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मी आज तुम्हाला कुठलीही जागा सांगणार नाही. मी योग्यव्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटून ही माहिती देणार आहे. जर त्यांना ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरज आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. त्यासाठी मी त्यांना जाऊन भेटणार आहे.” असे राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *