मोठी बातमी! राज ठाकरेंचे खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरल्यामुळे ठाकरेंनी हे पत्र लिहिले आहे.

मोठी बातमी! राज ठाकरेंचे खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र
raj thackeray and varsha gaikwad
| Updated on: Jul 28, 2025 | 6:55 PM

Raj Thackeray : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरल्यामुळे ठाकरेंनी हे पत्र लिहिले आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील खासदारांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरलं होतं. तसेच दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे. मराठी माणसाला आपटून आपटून मारू निशिकांत दुबे म्हणाले होते.

राज ठाकरेंच्या पत्रात काय आहे?

राज ठाकरेंनी वर्षा गायकवाड यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. मराठी माणसानां आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, अन्याय होत असताना संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही कृतीने छेद दिलात. याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात वर्षा गायकवाड यांना उद्देशून म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्राला सध्या “व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासले लं आहे. माझ्या मते
हा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरं
आहे. कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी
काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहेत,
मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनवेप्रती, या प्रांताबद्दल आपली
जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तुम्ही ती ताकद दाखवलीत याबद्दल…

सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या आणि  1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणे असूदेत. यात मरहट्टे होते. याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरंना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठीची माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे. तुम्ही ती ताकद दाखवलीत याबद्दल मनापासून आभार, असेही मत ठाकरे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले आहे.

तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे

तसेच, महाराष्ट्रातील इतर 45 खास दार गप्प का बसले माहीत नाही. पण तुम्ही हिंमत
दाखवलीत याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील
आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. तसेच महाराष्ट्र, मराठी  भाषा आणि मराठी माणूस यासमोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत, असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us