Raj Thackeray: नामांतराचा निर्णय आताच का?, अडीच वर्ष काय करत होतात; औरंगाबादच्या नामांतरावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Jun 30, 2022 | 8:05 AM

उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र आता या प्रस्तावावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray: नामांतराचा निर्णय आताच का?, अडीच वर्ष काय करत होतात; औरंगाबादच्या नामांतरावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नामांतराचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गेली अडीच वर्ष सत्ता होती. मग आताच का नामांतराचा निर्णय घेण्यात आला. आताच का नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या नामांतराच्या प्रस्तावामागे सरकारचा हेतू काय हे कोणापासूनही लपून नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जे काम आपले नाहीच, ते काम आपण केले असे सांगण्यात काय हशील अशा शद्बात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारव टीका केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालये, रेल्वेचे मुख्य कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफीस अशी विविध महत्त्वाची प्रशासकीय कार्यालय असतात. त्या शहराची नावे राज्य सरकारला बदलण्याचा अधिकार नसतो. अशा शहरांची नावे केवळ केंद्र सरकारच बदलू शकते, आजपर्यंत जेवढ्या मोठ्या शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ती केंद्रानेच बदलली आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास बॉम्बेचे मुंबई, मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज ही सर्व नावे बदलताना त्यावर केंद्राने शिक्कामोर्तब केल्यानंतरच ही नावे बदलण्यात आली. मुळात राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला तो निर्णय नसून एक प्रस्ताव आहे. आता हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवाा लागेल, त्यानंतर केंद्र त्यावर निर्णय घेईल. मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये हा निर्णय घेतला गेला नाही. मग आजच या निर्णयाची गरज का लागली. त्यामागे कोणता हेतू होता. हे कोणापासूनही लपून राहिले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादच्या नामांतर प्रस्तावाला मंजुरी

उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी बुधवारी रात्रीच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मात्र राजीनाम्यापूर्वी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करण्यात यावे, तसेच उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात यावे अशी मागली गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर उद्धव ठाकरे सरकारने या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र आता यावरून उद्धव ठाकरे सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.