Raju Shetti : देवेंद्र फडणवीस आता कोणाला डोक्यावर घेणार, पूरग्रस्तांची मदत जाहीर झाल्यानंतर राजू शेट्टी यांचा फडणवीसांना टोला

ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या रास्त व किफायतशीर किमतीवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

Raju Shetti : देवेंद्र फडणवीस आता कोणाला डोक्यावर घेणार, पूरग्रस्तांची मदत जाहीर झाल्यानंतर राजू शेट्टी यांचा फडणवीसांना टोला
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 11, 2022 | 6:53 AM

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरु होता. परंतु एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यमंत्री वर्णी लागल्यानंतर कमी झाल्याचा पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA) महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने त्यांना प्रत्येक गोष्टी जाब विचारायला सुरु केला होता. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. आता भाजप आणि शिंदे गट राज्यात सत्तेत आल्यापासून त्यांच्यावरती विरोधक टीका करीत आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तिवृष्टी व पुरग्रस्तांना हेक्टरी 15 हजार रुपये मदत जाहीर केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा डोक्यावर घेतली होती. आता कुणाला डोक्यावर घेणार असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

नेमकं काय आहे ट्विटमध्ये

“एकनाथ शिंदे साहेब ज्या मंत्रीमंडळात होते.त्या महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी अतिवृष्टी व पुरग्रस्तांना हेक्टरी 15 हजार रुपये मदत जाहीर करून थट्टा केली होती तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा डोक्यावर घेतली होती. आता मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 13600रुपये मदत जाहीर केले आहे.आता देवेंद्र फडणवीस कोणाला डोक्यावर घेणार” अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केली आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर सडकून टीका

ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या रास्त व किफायतशीर किमतीवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2022-23 गळीत हंगामासाठी कारखान्यांनी ऊस उत्पादकांना द्यावी लागणारी किमान किंमत 15 ते 305 रुपये प्रति क्विंटलने सरकारने बुधवारी वाढवली. या निर्णयामुळे सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना तसेच साखर कारखानदार आणि संबंधित सहायक कामांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे पाच लाख कामगारांना फायदा होईल, असे सरकारने म्हटले आहे. पण त्यानंतर राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांनी त्यांच्या विरोधात देखील आक्रमक भूमिका घेतल्या होत्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें