Rajyasabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मतदानाला ईडीचा विरोध, आज कोर्टात फैसला होणार

| Updated on: Jun 08, 2022 | 6:10 AM

मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तर एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणात नवाब मलिकही अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत.

Rajyasabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मतदानाला ईडीचा विरोध, आज कोर्टात फैसला होणार
नवाब मलिक, देशमुखांना राज्यसभेसाठी मतदान करता येईल का?, नव्या कायद्याने पेच?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) राजकीय वातावारण तापवलं आहे. एक-एक मतदान जोडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची पळापळ सुरू आहे. त्यासाठी रोज अपक्ष आणि मित्रपक्षांच्या मनधरणी दोन्ही बाजुने सुरू असतानाच आता महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या हक्काच्या दोन मतांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवबा मलिक (Nawab Malik) यांना मतदानासाठी परवानगी देण्यास ईडीने विरोध केला आहे. आज ईडीच्या कोर्टात याबाबत सुनावणी होणार आहे. तेव्हाआजच्या सुनावणीत काय फैसला होतो? पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तर एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणात नवाब मलिकही अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत.

कोर्ट परवानगी देणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनीच सचिन वाझेला महिन्याला शंभर कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला. याच प्रकरणात देशमुख जेलमध्ये आहेत. तर दुसरीकडे दाऊदची बहीण हसीन पारकर हीच्या केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणा काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

मतदानाबाबत आज फैसला

या दोघांच्या मतदानासाठी राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली आहे. कारण महाविकास आघाडीसाठी एक-एक मत हे महत्वाचे असणार आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांचं मतदान हे त्यांच्या हक्काचं मतदान आहे. त्यामुळे ही मतं पारड्यात पाडण्यासाठी महाविकास आघाडीची धडपड सुरू आहे. मात्र ईडीच्या विरोधामुळे आता यांना मतदान करता येणार नाही, हे आज स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीच्या गोटातील हलचाली वाढल्या

महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी आपले पत्ते अजून ओपन केले नसल्याने आता महाविकास आघाडीच्या गोटातील हलचाली वाढल्या आहेत. आज महाविकास आघाडीकडून मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भव्य अशी बैठक घेण्यात आली आहे. या ठिकाणी आमदारांना मतदान कसं करायचं याची रंगीत तालीमही घेण्यात येत आहे. तसेच शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे अशा बड्या नेते मंडळींनी यावेळी महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदारांना मार्गदर्शनही केलंय.

तर दुसरीकडे भाजपकडूनही सापळा लावण्यात येत आहे. अपक्ष आमदार तसेच महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.