राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला

या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत. या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला
| Edited By: | Updated on: Nov 19, 2022 | 3:33 PM

पुणे : सावरकर यांच्यावर टीका करणं योग्य नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, अशाप्रकारे टीका करून वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीची टीका करणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. काँग्रेस ही खिळखिळ झाली आहे. त्या काँग्रेसला मजबूत करणं आवश्यक आहे. काँग्रेसची अवस्था ना घरकी ना घाट की, अशी झाली आहे.

पिंपरी येथे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर हा वाद करू नये.  टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाचे पिंपरी मध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले. या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत.  या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये भाजप जिंकणार, असा दावाही आठवले यांनी केला. राज ठाकरे यांच्याबरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

गुजरातमध्ये भाजपला फायदा होणार आहे. गुजरातची जनता ही मोंदी यांच्या पाठीशी उभी राहील. राहुल गांधी यांची यात्रा ही समाजात फूट पाडण्याचं काम या माध्यमातून करणार, असा आरोप असल्याचं रामदास आठवले म्हणाले.