रामदास आठवले लोकसभा लढवणार? राधाकृष्ण विखे पाटलांना दिलं भन्नाट उत्तर

| Updated on: Mar 12, 2022 | 8:53 PM

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीत येण्याचं निमंत्रण दिल्यानंतर रामदास आठवले यांनीही मी कायमच शिर्डीत येत असतो जर मी आलो तर तुम्हाला साथ द्यावी लागेल म्हणत पुन्हा खासदारकी लढवण्याचे संकेत दिले.

रामदास आठवले लोकसभा लढवणार? राधाकृष्ण विखे पाटलांना दिलं भन्नाट उत्तर
रामदास आठवले
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या वयोश्री योजनेत अहमदनगर जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावलाय. योजना सुरू झाल्या पासून जिल्ह्यातील तब्बल चाळीस हजार वयोवृद्ध नागरीकांना गरजेच्या वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. आज शिर्डीमध्ये सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत 1300 नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीत येण्याचं निमंत्रण दिल्यानंतर रामदास आठवले यांनीही मी कायमच शिर्डीत येत असतो. जर मी आलो तर तुम्हाला साथ द्यावी लागेल म्हणत पुन्हा खासदारकी लढवण्याचे एक प्रकारे सुतोवाच केलय.यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा रामदास आठवले शिर्डीतून उमेदवारी करणार का?? या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मी आलो तर साथ द्यावी लागेल

देशभरातील दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अपंगांना व्हिलचेअर, काठी, वॉकर यासह दृष्टीदोष असणारांना चष्मे आणी इतर अशा 35 प्रकारच्या वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. अहमदनगर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवत आजवर तब्बल चाळीस हजार वयोवृद्धांना साहित्याचे वाटप केले आहे. देशात सर्वाधिक प्रभावीपणे योजना राबवणारा अहमदनगर जिल्हा प्रथम ठरलाय. आज शिर्डीमध्ये सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत 1300 नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डीत येण्याचे निमंत्रण दिले. राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीत येण्याचं निमंत्रण दिल्यानंतर रामदास आठवले यांनीही मी कायमच शिर्डीत येत असतो जर मी आलो तर तुम्हाला साथ द्यावी लागेल म्हणत पुन्हा खासदारकी लढवण्याचे संकेत दिले.

…तर शिवसेनेचा सुपडा साफ होईल

भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल अस थेट आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिलंय. अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यात जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिलाय. 2024 साली महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार असून शिवसेनेने अजूनही भाजपसोबत यावे असा सल्ला देखील आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. शिर्डी येथे आयोजीत वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केलय.

काँग्रेसनं भाजपला आव्हान देऊ नये

काँग्रेसची स्थिती अगदी भयंकर झालीय.राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असं दिसत नाही त्यामध्ये पक्षांतर्गतच वाद सुरू आहेत. भाजपला आव्हान देण्याचं काम काँग्रेसने करू नये.गांधी परिवाराचे आकर्षण आता संपलंय. काँग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलय.

इतर बातम्या:

Ramdas Aathwale | शिवसेनेने भाजपसोबत येण्याचा विचार करावा, आठवलेंचा शिवेसनेला सल्ला

Kolhapur मध्ये 12 एप्रिलला होणार पोटनिवडणूक आणि 16 एप्रिलला निकाल