जालन्यात दानवे-खोतकरांची गळाभेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

जालना : भाजप-शिनसेना युतीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात प्रथमच गळाभेट पाहायला मिळाली. जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भव्य रोग निदान आरोग्य महामेळावा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण शिबिरातील वावर आणि देहबोली जणू आमच्यात कुठलेच वैर नाही असे दर्शवणारी होती. व्यासपीठावर कानगोष्टी, हास्यविनोद, चर्चा आणि एकमेकांना टाळी देत त्यांनी […]

जालन्यात दानवे-खोतकरांची गळाभेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या
Follow us on

जालना : भाजप-शिनसेना युतीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात प्रथमच गळाभेट पाहायला मिळाली. जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भव्य रोग निदान आरोग्य महामेळावा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण शिबिरातील वावर आणि देहबोली जणू आमच्यात कुठलेच वैर नाही असे दर्शवणारी होती. व्यासपीठावर कानगोष्टी, हास्यविनोद, चर्चा आणि एकमेकांना टाळी देत त्यांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं. हातात हात आणि गळाभेट घेणाऱ्या या दोन नेत्यांच्या भूमिका व्यासपीठ सोडल्यावर मात्र बदलतात याचा अनुभव खोतकरांच्या ‘मी अजून मैदान सोडलेलं नाही’ या विधानाच्या निमित्ताने आला हे विशेष.

जालन्यात भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं वैर उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. यावर्षी लोकसभेला दानवेंना पाडण्याची शपथच खोतकरांनी घेतली होती. पण युती झाली आणि त्यांची अडचण वाढली. कारण, युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. पण दानवेंना पाडण्यासाठी बंड करण्याचे संकेतही खोतकरांनी दिले. शिवाय त्यांना काँग्रेसकडूनही ऑफर आली.

युतीत जालन्याची जागा भाजपकडे असल्याने दानवेंना तिकीट मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची चाचपणी सुरु केली. विविध चर्चा रंगू लागल्या. पण आपण ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, असं म्हणत खोतकरांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खोतकरांना भेट नाकारल्याचंही बोललं जात होतं.

जालन्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या राजकारणात आजचा दिवस भुवया उंचावणारा होता. दोघे एकाच व्यापीठावर येत असल्याने शिवसेना-भाजपच नाही, तर सर्वांमध्येच उत्सुकता होती. अखेर दोघे एका व्यासपीठावर आले आणि त्यांनी खेळीमेळीने गप्पाही मारल्या. हे मनोमिलन असंच कायम राहतंय की फक्त आजच्यापुरतं होतं हे येणाऱ्या काळात दिसेलच.