Nilesh Rane: विनायक राऊतांनी चेन आणि पैसे घेतले शिवसेनेच्या खासदाराचा आरोप, निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया, “आव आणता काय?”

| Updated on: Jul 22, 2022 | 10:04 AM

Vinayak Raut : विनायक राऊतांनी चैन आणि पैसे घेतले शिवसेनेच्या खासदाराचा आरोप, निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

Nilesh Rane: विनायक राऊतांनी चेन आणि पैसे घेतले शिवसेनेच्या खासदाराचा आरोप, निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया, आव आणता काय?
Follow us on

रत्नागिरी : पैसे आणि सोन्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार असलेल्या विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे लोकांच्या खिशात हात जातात, असं त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आता बोलत आहेत. हे ऐकून फार आश्चर्य वाटलं नसलं तरीही खासदारकीची वैभवशाली परंपरा असलेला हा मतदार संघ आणि कोकण, या पेटी वाजवून सभ्यपणाचा आव आणणाऱ्या माणसामुळे बदनाम होतं आहे, असा संताप भाजपा प्रदेशचिटणीस निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्यांच्याच पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी विनायक राऊतांनी संतोष बांगर यांच्याकडून चैन घेतल्याचा गौप्यस्फोट केला. त्याआधीच आमदार राजेश क्षीरसागर यांनीही राऊतांविषयी गौप्यस्फोट केले होते.

निलेश राणे काय म्हणाले?

या सगळ्या घडामोडी नंतर निलेश राणे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, “खासदार विनायकरावबद्दल जे काय मागच्या पंधरा दिवसापासून त्यांच्याच पक्षातले सहकारी आमदार खासदार जे काय बोलतात ते ऐकून माझ्यासारख्या माणसाला आश्चर्य वाटलं नाही, कारण मला माहित होतं की हा माणूस तसाच आहे. पण वाईट या गोष्टीचा वाटतं याच्यामुळे कोकणाचे नाव खराब झालं. हा माणूस कोकणातून निवडून जातो, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा खासदार आहे, असा माणूस महाराष्ट्रात बदनाम होणे हे आमच्या मातीसाठी, आमच्या कोकणासाठी ऐकायला बरं वाटत नाही.”

हे सुद्धा वाचा

राऊतांवरचे आरोप

शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर 12 खासदारांनीही शिंदेंना आपला पाठिंबा दिला. या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं. यानंतर शिंदे गटातील खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. चेन आणि पैसे घेतल्याचा आरोप हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केला आहे.