Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप, महायुतीत पुन्हा जुंपणार?

Ravindra Dhangekar: विधानपरिषदेच्या निकालानंतर शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Ravindra Dhangekar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 11:32 AM

विधानपरिषदेच्या निकालानंतर शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यामध्ये चांगलीच जुंफली आहे. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रविंद्र धंगेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा सूर्यवंशीचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले की, राज्यात गृहखात काय करत आहेत? भाजपच्या कार्यर्त्यांनी मला टार्गेट केलं मी खर बोलत आहे मी सत्य मांडत होतो. राणा सूर्यवंशी हा एक उद्योजक आहे. बनावट हल्ला प्रकरणी यांचं नाव आलं होतं. अनेकदा खोट बोलून हल्ले घडवले आणि सरकारकडून Y सुरक्षा घेतली आहे. त्यांच्यावर हल्ला कुणी केला? हत्यार कुठून आले? दाते साहेब याचा तपास करत आहेत. नेमकी पोलिस महासंचालकांना का जबाबदारी दिली आहे? हा कुणाच्या जवळचा आहे? राणा सूर्यवंशी नेमका कुणाचा आहे? हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कुठे फिरत आहे? याच्या मागे गृहखात आहे का मुख्यमंत्री याच्या मागे आहेत का? राज्यात काय सुरू आहे? याचे धंदे नेमके काय आहेत? याने गडचिरोली मध्ये जो प्रकल्प केला आहे तो कसा उभा केला जमिनी कश्या हस्तगत केल्या आहेत. कुणाच ब्लॅक पैसा हा व्हाईट करत आहे का? हा हल्ला बनावट आहे.

Loading...

पुढे ते म्हणाले की, हा देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत कसा पोचला याचा तपास देखील झाला पाहिजे. अनेक लोकांना पोलिसांमार्फत याने त्रास दिला आहे. अनेक घटना त्याने घडवून आणल्या आहेत. पोलिस जर याच्या पाठीमागे उभे राहत असतील तर का राहतात याच उत्तर भाजपने द्याव. माझी देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती आहे की यात लक्ष घालून कारवाई झाली पाहिजे. अशा फसव्या उद्योगपतींना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. पोलीस का दुर्लक्ष करत आहेत? या आरोपीवर गुन्हा का दाखल होत नाही याला नेमकं कोण सांगितलं संरक्षण देत आहे. मी आज वाट बघणार अन्यथा मुंबईत पोलीस महासंक ओफिसाबाहेर आंदोलन करणार. त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवून त्यांच्या जवळ गेला आहे. याला नेमकं कोण मदत करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सगळे विचारत आहे ते शिवसैनिक म्हणून विचारत आहे. सत्तेत बसलेल्या लोकांनाच आम्ही जबा विचारणार. मी बन ला सोडून दिलं आहे लोक त्याला आता उत्तर देतील मला जे बोलायचं होत ते मी त्याच्यावर बोललो आहे.

माकड छाप या आरोपावर उत्तर देत रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी मानव आहे. माझा जन्मच माकडाच्या स्वरूपातच झालेला आहे असे लोक म्हणतात. हे त्याच्या आई वडिलांना त्याने विचारलं का? त्याचे आई-वडील उत्तर देतील. योग्य उत्तर देतील आपण मानवाच्या पोटी जन्मलेला आहोत असे म्हणतात. पण तो डायनासॉरसारखा बोलत आहे. म्हणजे त्याची उपजत मला आता शोधला पाहिजे आणि विषया काय गंभीर राहिलेला नाही. मी माकड छाप आहे तर मानवाचाच जन्म माकडापासून आला असे लोक मानतात. याचं सगळं उत्तर त्याचे आई वडिल देतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us