AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर
bhagirath bhalke
| Updated on: Apr 16, 2021 | 11:44 AM
Share

पंढरपूर: राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर- मंगळवेढ्याचं नेमकं गणित काय? यावर टाकलेला हा प्रकाश. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

भालकेंची हॅट्रीक

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावं माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे.

भाजपचा आटापिटा का?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं हे सरकार आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागल्याने भाजपला मोठी सल बोचत आहे. त्यामुळे या निडवणुकीत विजयी होऊन जनमत भाजपच्याच बाजूने असून भाजपचीच राज्यात लाट असल्याचं भाजपला दाखवून द्यायचं आहे. शिवाय कोरोनापासून ते आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा संदेशही भाजपला द्यायचा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तीन पक्षांना एकटा भाजप टक्कर देऊ शकतो का? याची चाचपणीही भाजपला करायची आहे. त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी लिटमस टेस्ट असून त्यामुळेच भाजपने विजयासाठी आटापिटा सुरू केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

आवताडेंची ताकद

समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. सहकाराचं जाळं आणि लोकसंपर्क याचा त्यांना फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

आवताडे-भालकेंची डोकेदुखी

या मतदारसंघात केवळ आवताडे आणि भालके यांच्यातच लढत होणार आहे. आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे आवताडे यांची तर शिवसेनेच्या पदाधिकारी शैलजा गोडसे या निवडणूक रिंगणात असल्याने भालके यांची डोकेदुखी वाढली आहे. हे दोन्ही उमेदवार किती मते खातात यावर भालके आणि आवताडे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

3 लाख मतदार करणार फैसला

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळुंगे यांना 7232 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

सहानुभूती की ताकद?

ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. गेल्या निवडणुकीत आवताडे यांनी अपक्ष लढूनही 54 हजार मते मिळवली होती. तर भाजपच्या परिचारक यांनी 76 हजार मते मिळवली होती. या दोघांची मते एकत्रित केल्यास 1 लाख 30 हजाराच्यावर जातात. भालके यांना 89 हजार मते मिळाली होती. भाजप आणि आवताडेंची मते एकत्रित केल्यास भालके यांना मिळालेल्या मतांपेक्षा आवताडेंकडे आता 40 हजार मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे आकडेवारीत तरी आवताडेंचा विजय सोपा असल्याचं मानलं जात आहे. मात्र, भालके यांचं निधन झाल्याने भगीरथ यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांचीही बेगमी त्यांच्याकडे असल्याने या निवडणुकीवर सध्या तरी काहीही भाष्य करणं योग्य नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

संबंधित बातम्या:

‘चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही गप्प, नाहीतर…’, जयंत पाटलांचा भाजपला मोठा इशारा

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

ठाकरे सरकार कधी आणि कसं पडणार हे अजिदादांना ठाऊक आहे; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

(read analysis of Pandharpur Assembly by-Election)

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक