प्रादेशिक राजकीय पक्षांनीचा 55% निधी “अज्ञात सोर्सेज” कडून, एकूण 885.95 कोटी रुपये निधी गोळा

| Updated on: Nov 12, 2021 | 7:29 PM

ADR च्या महितीनुसार, 2019-20 मध्ये प्रादेशिक पक्षांनी अज्ञात सोर्सेजकडून 445.7 कोटी रुपये गोळा केले. ही रक्कम एकूण निधीच्या 55.50 टक्के आहे. 23 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 885.95 कोटी रुपये आहे आणि अज्ञात सोर्सेजकडून मिळणाऱ्या निधीत 1.18% वाढ झाली आहे.

प्रादेशिक राजकीय पक्षांनीचा 55% निधी अज्ञात सोर्सेज कडून, एकूण 885.95 कोटी रुपये निधी गोळा
Follow us on

भारतातील राजकीय निधी किती आणि कोणाकडून येतो हा नेहमी प्रश्न राहहीलेला आहे. या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही, पक्ष छुपे मार्ग शोदतातच. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने केलेल्या विश्लेषणात असे आढळून आले आहे की ‘अज्ञात सोर्सेज’ (unknown sources) मार्फत आलेला निधी अजूनही भारतातील राजकीय पक्षांच्या निधीचा मोठा भाग आहे. (regional political Parties Rs 445.7 crore funds from unknown sources, total funds in 2019-20 885.95  crore)

ADR च्या महितीनुसार, 2019-20 मध्ये प्रादेशिक पक्षांनी अज्ञात सोर्सेजकडून 445.7 कोटी रुपये गोळा केले. ही रक्कम एकूण निधीच्या 55.50 टक्के आहे. 2019-20 मध्ये, 23 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 885.95 कोटी रुपये आहे आणि अज्ञात सोर्सेजकडून मिळणाऱ्या निधीत 1.18% वाढ झाली आहे. या एकूण निधीतला 95.61 टक्के म्हणजे 426.23 कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्समधून आले आणि प्रादेशिक पक्षांनी स्वैच्छिक योगदानातून 4.97 कोटी रुपये जमा केले.

सध्या, राजकीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा कमी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचे नाव उघड करण्याची आवश्यकता नाही. त्यामूळे मोठ्या प्रमाणात निधी कोणी दिला हे शोधला कठीण आहे. यामूळे, अज्ञात सोर्सेजकडून आलेल्या रक्केत वाढ झाली असावी. ADR ने असं ही सांगितलं की, काही पक्षांच्या देणग्यांचा डेटा वेबसाईट वर आहे, पण तो डेटा आणि त्यांचा 2019-20 च्या ऑडिट रिपोर्ट मध्ये घोषित केलेल्या रक्कमेशी जुळत नाही.

हे ही वाचा –

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण?, इस्लामपूर आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक

ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी, गरज पडल्यास प्रभाकर साईलची पुन्हा चौकशी करू: ज्ञानेश्वर सिंह

पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपने 14 जागा जिंकल्या, काँग्रेसचा पराभव, शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी