AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमेश लटके यांच्या ‘त्या’आठवणीला उजाळा देत ऋतुजा लटके यांची प्रचाराला धडाक्यात सुरुवात

शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

रमेश लटके यांच्या 'त्या'आठवणीला उजाळा देत ऋतुजा लटके यांची प्रचाराला धडाक्यात सुरुवात
| Updated on: Oct 15, 2022 | 12:12 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण चांगलचं तापलं आहे. जोरदार आरोप-प्रत्यारोप  सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आम्हीच विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली.

रमेश लटके यांच्या आठवणींना उजाळा

ऋतुजा लटके यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे. गणेशाचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रमेश लटके यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. लटके साहेब नेहमी गणपती मंदिरात येऊन आधी बाप्पाचं दर्शन करायचे आणि नंतर प्रचारला सुरुवात करायचे. आम्ही देखील आज गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करत आहोत, असं लटके यांनी म्हटलं आहे.

सच्चा शिवसैनिक पाठिशी

यावेळी बोलताना ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे की,  मला खात्री आहे मीच निवडून येईल. सच्चा शिवसैनिक माझ्या पाठिशी उभा आहे. मी काल जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते, तेव्हा झालेली गर्दीच सर्वकाही सांगत होती, लटके साहेबांवर ज्यांची निष्ठा आहे, प्रेम आहे ते सर्व माझ्यासोबत आहेत, असं लटके यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत