कोणते खाते आवडेल? धीरज देशमुख आणि रोहित पवार म्हणतात…..

| Updated on: Dec 21, 2019 | 3:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे युवा आमदार धीरज देशमुख (Rohit Pawar and Dhiraj Deshmukh) यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे जाऊन, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं.

कोणते खाते आवडेल? धीरज देशमुख आणि रोहित पवार म्हणतात.....
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे युवा आमदार धीरज देशमुख (Rohit Pawar and Dhiraj Deshmukh) यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे जाऊन, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं. दीक्षाभूमीवर दर्शनानंतर दोन्ही आमदारांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.  आम्ही नागपूरला जेव्हा येतो तेव्हा दर्शनाला येत होतो. आम्हाला प्रेरणा मिळत असते. अधिवेशनाचा अनुभव चांगला राहिला खूप काही शिकता आलं, असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar and Dhiraj Deshmukh)

अधिवेशनातील गोंधळाची सवय झाली आहे. आमच्यासारख्या नवीन लोकांना बोलायला संधी मिळाली, खूप काही शिकता आलं. भाजपच्या ज्येष्ठ आमदारांनीही आम्हाला मार्गदर्शन केलं. अनुभव वाढला की सभागृहात लोकांचे प्रश्न आणखी मांडू, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, यावेळी धीरज देशमुख यांनी अजित पवार यांचे आभार मानले. अजित पवार यांनी काल धीरज देशमुख यांचं कौतुक करताना, त्यांच्यात विलासरावांची छाप दिसते असं म्हटलं होतं. याबाबत धीरज देशमुख म्हणाले, अजितदादांचा मी आभारी आहे. दादांनी स्तुती केली.  आज दादांच्या वाणीतून बाबांनी स्तुती केल्याचं वाटलं”

मंत्रिमंडळ  विस्तारमध्ये आहात का

रोहित पवार – नेते ठरवत असतात मंत्रिमंडळाबाबत. मतदारांनी पाठवलं त्यांची सेवा करायची आहे. जिथं कुठं अडचण आहे, ते सोडवण्याची जबाबदारी माझी आहे.

धीरज देशमुख – मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे, महाराष्ट्राच्या कामाला गती मिळेल. विरोधक फक्त विरोधासाठी मुद्दे मांडत होते. महाराष्ट्रात जे प्रश्न भेडसावत आहेत, ते फक्त टीका करण्यासाठी.

कोणते खाते आवडेल

रोहित पवार – युवक म्हणून असं वाटतं की मंत्री म्हणून नाही,  स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करायला आवडेल.

धीरज देशमुख – लोकांनी निवडून दिलं हेच माझं खातं आहे, लोकांचे काम करणे हेच खातं आहे.

संबंधित बातम्या  

आदित्यला अहंकार नाही, धीरजमध्ये विलासरावांची छाप : अजित पवार