आदित्यला अहंकार नाही, धीरजमध्ये विलासरावांची छाप : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar appreciates Aaditya Thackeray Dheeraj Deshmukh) यांनी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

आदित्यला अहंकार नाही, धीरजमध्ये विलासरावांची छाप : अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 11:13 AM

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar appreciates Aaditya Thackeray Dheeraj Deshmukh) यांनी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. याशिवाय अजित पवारांनी काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचीही स्तुती केली. “आदित्य नवखा आहे. सगळ्यांमध्ये मिसळतो. काय करता येईल हे सभागृहात पाहतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही. अहंकार दिसत नाही,  हे कौतुकास्पद आहे”, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar appreciates Aaditya Thackeray Dheeraj Deshmukh)

“मिटिंग असली आणि  कोणीही सीनिअर आले तर आदित्य लगेच खुर्ची खाली करुन देतो, मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असं वागणं नाही, अहंकार नाही”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

याशिवाय अजित पवारांनी काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचंही कौतुक केलं.

“धीरज बोलताना तर मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असं वाटलं, बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासरावच वाटत होते, असं अजित पवार म्हणाले. आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं करत आहे”, असं म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचं कौतुक केलं.

अजित पवारांनी पत्रकारांशी आज अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात 

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार (Ajit Pawar on Farmer loan Waive ) याविषयी म्हणाले. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात : अजित पवार 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.