…तर काही भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीसाठी राजभवनावर मुक्काम ठोकला असता: रोहित पवार

| Updated on: Feb 14, 2022 | 12:37 PM

रोहित पवार यांनी गुजरातमध्ये (Gujrat) सप्टेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचा उल्लेख करत भाजपा (BJP) नेत्यांवर टीका केली आहे.

...तर काही भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीसाठी राजभवनावर मुक्काम ठोकला असता: रोहित पवार
राष्ट्रावदी आमदार रोहित पवार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ड्रग्जच्या मुद्यावर भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ड्रग्जच्या मुद्यावरुन गेल्या काळात राजकारण तापलेलं होतं. रोहित पवार यांनी गुजरातमध्ये (Gujrat) सप्टेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचा उल्लेख करत भाजपा (BJP) नेत्यांवर टीका केली आहे. गुजरात मध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या तुलनेत महाराष्ट्रात 1 टक्के ड्रग्ज सापडलं तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, यामागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी राजभवनावर मुक्कामच ठोकला असता, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ड्रग्ज सापडल्यावर बोलणाऱ्या नेत्यांनी भाजपशासीत राज्यात सापडणाऱ्या ड्रग्जवर बोलायला हवं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आता भाजप नेते काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

गुजरातमध्ये किती ड्रग्ज सापडलं रोहित पवार यांनी दिली आकडेवारी

सप्टेंबर 2021 मध्ये 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडल्याची माहिती पवार यांनी दिली. नोव्हेंबरमध्ये 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं. जानेवारी महिन्यात 2 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केली.

रोहित पवार यांचं ट्विट

तर, भाजपच्या नेत्यांनी राजभवानवर मुक्काम ठोकला असता

गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या तुलनेत 1 टक्के ड्रग्ज जरी महाराष्ट्रात सापडलं असतं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,या मागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी तर राजभवनावर मुक्कामच ठोकला असता, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

भाजपशासीत राज्यात सापडणाऱ्या ड्रग्जवर बोलायला हवं

केवळ बिगर भाजपशासित राज्यात थोडं जरी ड्रग्ज सापडलं तरी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी भाजपशासित राज्यात सापडणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्जवरही बोललं पाहिजे. कारण युवांच्या सुरक्षित भवितव्यासाठी ड्रग्ज या विषयाकडं राजकारणापलीकडं जाऊन पाहण्याची गरज आहे, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता

तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?