घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्राला टोला

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. (rupali chakankar attacks modi government over vaccine shortage)

घरात नाही दाणा, पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्राला टोला
rupali chakankar
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 2:18 PM

पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. (rupali chakankar attacks modi government over vaccine shortage)

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यांनी पोस्टबरोबर एक व्हिडीओही शेअर केला आहे. घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

मलिकांचीही टीका

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे मलिक म्हणाले.

देश एकजूट, करा अटक

मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करtन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. (rupali chakankar attacks modi government over vaccine shortage)

संबंधित बातम्या:

ही तर भाजप सरकारची कायरता, किती लोकांना अटक कराल?; नवाब मलिकांचा घणाघाती हल्ला

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ, पोलीस महासंचालक चंदिगढ हॉलिडेवर, शिवसेनेची संजय पांडेंवर कारवाईची मागणी

Maharashtra Coronavirus LIVE Update : सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण : देवेंद्र फडणवीस

(rupali chakankar attacks modi government over vaccine shortage)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.