राहुल शेवाळेंविरोधात रुपाली ठोंबरे आक्रमक, आज नागपुरात काय घडामोडी?

सदर महिलेची ओळख उघड केल्याने महिला आयोगाने ठोंबरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राहुल शेवाळेंविरोधात रुपाली ठोंबरे आक्रमक, आज नागपुरात काय घडामोडी?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 9:05 AM

पुणेः खासदार राहुल शेवाळेंविरोधात (Rahul Shewale) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) आक्रमक झाल्या आहेत. शेवाळेंविरोधातले पुरावे घेऊन त्या आज नागपूरात जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेणारआहेत. ज्या महिलेने राहुल शेवाळेंविरोधात तक्रार केली आहे, तिच्या जीवाला धोका असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.

दरम्यान, ठोंबरे यांनी सदर महिलेसोबत फेसबुक लाइव्ह केल्याने तसेच तिची ओळख उघड केल्यामुळे ठोंबरेंविरोधात कारवाई करण्याचा इशारा महिला आयोगाने दिला आहे. मात्र, मी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

  • शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने शोषणाचे आरोप केले आहेत.
  • सोमवारी राहुल शेवाळे यांनी एक पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले.
  • आपल्याविरोधातील आरोपांमागे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात अस्लयाचा आरोप शेवाळे यांनी केला आहे.
  •  यावर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
  •  सदर महिलेचे दाऊद आणि डी गँगशी संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.
  •  तर शेवाळेंकडे या दाव्यासाठीचे पुरावे असतील ते सादर करावे, असं आवाहन केलंय.
  •  या महिलेचे दाऊदशी संबंध असते तर तुम्ही तिच्याशी संबंध कसे ठेवले, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केलाय.
  •  राहुल शेवाळेंविरोधातील पुरावे घेऊन आज रुपाली पाटील ठोंबरे नागपुरात धडकणार आहेत.
  •  मात्र सदर महिलेची ओळख उघड केल्याने महिला आयोगाने ठोंबरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
  • माझ्याविरुद्ध तक्रार खोट्या तक्रारी दिल्या आहेत, मिंधे लोक माझ्याविरुद्ध तक्रारी करत आहेत.  माझ्या लाईव्हबद्दल ही तरुणी आक्षेप घेऊ शकते. विधी विभागाचा त्यांना सल्ला घ्यावा, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.