AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ 7 मुद्द्यांमुळे ऋतुजा लटके यांना न्याय मिळणार?; कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वकील विश्वजीत सावंत यांनी आज कोर्टात लटके यांच्यावतीने बाजू मांडली.

'त्या' 7 मुद्द्यांमुळे ऋतुजा लटके यांना न्याय मिळणार?; कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 5:19 PM
Share

ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने फेटाळून लावला आहे. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे देत हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने लटके यांची याचिका दाखल करून घेतली असून उद्या उच्च न्यायालयात (bombay high court) त्यावर सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी आपल्या याचिकेत एकूण सात मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामुळे या सात मुद्द्यांवर कोर्ट काय निर्णय देते हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. आज मुंबई हायकोर्टात ऋतुजा लटके यांच्यावतीने वकील विश्वजीत सावंत यांनी आज न्यायमूर्ती जामदार आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्या खंडपीठापुढे प्रकरण मेंशन करून सुनावणी संदर्भात मागणी करण्यात आली. मुंबई हायकोर्टाकडून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या के परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वकील विश्वजीत सावंत यांनी आज कोर्टात लटके यांच्यावतीने बाजू मांडली.

या सात मुद्द्यांवर फोकस

3 ऑक्टोबरला दिलेला राजीनामा अद्याप पालिकेनं स्वीकारलेला नाही

माझा राजीनामा तातडीनं स्वीकारत 1 महिन्याचा नोटीस कालावधी माफ करण्यात यावा

ऋतुजा लटके पती रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोट निवडणुकीत लढण्यास इच्छुक असल्याचा याचिकेत उल्लेख

उमेदवारी अर्ज भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्यानं उद्याच हायकोर्टाचा निकाल अपेक्षित

ऋतुजा लटके यांनी आधी निवडणुकीकरता मुभा मागितली होती, मात्र ती पालिकेनं नाकारली आहे

त्यानंतर दिलेला राजीनामाही पालिकेनं अद्याप स्वीकारला नसल्याची याचिकेत माहिती

मात्र लटके या कोणत्या पक्षावर आणि चिन्हावर लढवणार याचा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...