Saamana Editorial: ‘निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक’ अग्रलेखातून भाजपला सुनावलं!

| Updated on: Apr 18, 2022 | 7:59 AM

कोल्हापुरचा (Kolhapur) विजय हा जातीय हिंसा घडवू पाहाणाऱ्यांना चपराक आहे. पाच ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपचा (BJP) सुपडा साफ झाला आहे. निवडणूका जिद्दीने, एकजुटीने लढल्या की, भाजपचा पराभव करता येतो. हे या पाच ठिकाणच्या पोटनिवडणूकीतुन स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे भाजपचा खूप मोठा पराभव झाला असे नाही.

Saamana Editorial: निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक अग्रलेखातून भाजपला सुनावलं!
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई – कोल्हापुरचा (Kolhapur) विजय हा जातीय हिंसा घडवू पाहाणाऱ्यांना चपराक आहे. पाच ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपचा (BJP) सुपडा साफ झाला आहे. निवडणूका जिद्दीने, एकजुटीने लढल्या की, भाजपचा पराभव करता येतो. हे या पाच ठिकाणच्या पोटनिवडणूकीतुन स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे भाजपचा खूप मोठा पराभव झाला असे नाही. पण भाजपचे बगलबच्चे देशभरात धार्मीक द्वेशाचा विषाणु पसरवत आहेत. धार्मीक हिंसेचे वनवे पेटवत असतांना चार राज्यातील निवडणूकीत भाजपचा पराभव झाला. ही भाजपला मोठी चपराक आहे. कोल्हापुरमध्ये भाजपला मिळालेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहेत. चार राज्यातील पराभवावर सामानातून (Saamana) भाजपला फटकारे मारण्यात आले आहेत.

चंद्रकांत पाटलांनी त्यावरून पलटी मारली आहे

चंद्रकांत पाटील यांनी राजकारण सोडूवन आपण हिमालयात जाऊ अशी घोषणाही केल्या गेली होती. त्यांना ही संधी कोल्हापूरकरांनी दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती. पण आता चंद्रकांत पाटलांनी त्यावरून पलटी मारली आहे. अर्थात चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातचं राहावे. कारण ते येथे राहतील तो पर्यंत मवीआ सरकारचा विजय होत राहील असे भाकीतही सामनामध्ये वर्तवण्यात आले आहे. कोल्हापूरात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय जनता पक्षासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरातील जिव्हारी लागला आहे. ते स्वत: पोट निवडणूक लढवतील असं वाटतं होतं. परंतु निवडणुकीच्यावेळी ते गायब झाले.

कोल्हापूरातल्या मतदारांची दिशाभूल केली

कोल्हापूरात देवेंद्र फडणवीस हे तळ ठोकून बसले होते. त्याचवेळी मशिदींवरील भोंगे विरूध्द हनुमान चाळीसारखे विषय तापवण्यात आले. पण विशेष म्हणजे या सगळ्याचा फायदा तिथं झाला नाही. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या तिथं अधिक मतांनी जिंकल्या. कोल्हापूरची ही मुळ जागा शिवसेनेची म्हणजे हिंदुत्ववादी विचाराची पाठराखण करणारा हा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात एखादं दुसरा अपवाद वगळता तिथं फक्त शिवसेनेचेच शिलेदार विजयी झाले आहेत.

Weather Update: पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता! विदर्भ वगळता मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

Car Accident : नाशिकमध्ये महिंद्रा झायलो मारुती ब्रीझाची जोराची टक्कर, 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू