AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘LIC’च्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतवा; दर महिन्याला बारा हजारांची पेन्शन मिळवा

एलआयसी सरल पेन्शन योजनेला (LIC Saral Pension Scheme) वृद्धत्त्वाची काठी म्हणून देखील ओळखले जाते. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला बारा हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकता.

'LIC'च्या 'या' योजनेत एकदाच पैसे गुंतवा; दर महिन्याला बारा हजारांची पेन्शन मिळवा
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 18, 2022 | 5:40 AM
Share

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी (LIC) ही आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना आणत असते. या योजना नेहमीच ग्राहकांच्या फायद्याच्या ठरतात. त्यामुळे आजही खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या (Insurance company) पॉलीसी खरेदी करण्यापेक्षा ग्राहक एलआयसीलाच प्राधान्य देताना दिसतात. तसेच एलआयसीमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी देखील अधिक मिळते. एलआयसीची अशीच एक योजना आहे. जीचे नाव एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme) असे आहे. या पेन्शन योजनेला वृद्धत्त्वाची काठी म्हणून देखील ओळखले जाते. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला बारा हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकता. या योजनेंतर्गंत तुम्हाला दोन पर्याय दिले जातात. त्यातील एका पर्याची निवड तुम्हाला करावी लागते. त्यानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो. जाणून घेऊयात या योजनेबद्दल.

लाभासाठी दोन पर्याय

ही एक मानक तात्काळ वार्षिक योजना आहे. या योजनेमध्ये एकरकमी रक्कम जमा केल्यानंतर गुंतवणूकदारांना कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या दोन पर्यायापैकी लाभासाठी एका पर्यायाची निवड करावी लागते. त्यावरून तुम्हाला नेमका लाभ कसा मिळणार हे ठरते. पहिला पर्याय असा आहे की, ज्या पर्यायामध्ये तुम्हाला मरेपर्यंत महिन्याला एक ठरावीक रक्कम पेन्शन मिळते. तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या नॉमिनीकडे प्रिमियम जमा केला जातो. दुसऱ्या ऑपशनमध्ये पती आणि पत्नी अशा दोघांनाही विभागून पेन्शन मिळते. पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाल्यास पेन्शची रक्कम जी व्यक्ती जीवंत आहे तिला मिळते. तिच्या मृत्यूनंतर नॉमीनीकडे प्रिमियम जमा केला जातो.

किती गुंतवणूक कराल?

या योजनेनेच आणखी एक वैशिष्ट म्हणजे तुम्हाला जर दर महिन्याला पेन्शन नको असल्यास तुम्ही दर तीन महिन्याला, सहा महिन्याला आणि वार्षिक आधारावर देखील या पेन्शचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये समजा एखाद्या व्यक्तीचे वय हे 42 वर्ष असेल आणि संबंधित व्यक्तीने जर सरल पेन्शन योजनेमध्ये 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला 12,388 रुपयांची पेन्शन मिळू शकते.

संबंधित बातम्या

घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट

तुम्ही तुमच्या वाहनात सीएनजी कीट बसवताय का.. तर, थांबा आता ‘सीएनजी’ गॅसही मिळणार चढया दरात !

Gold-Silver Weekly Report : आठवडाभरात सोने 1,063 रुपयांनी महागले; चांदीच्या दरातही तेजी

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.