AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir Daughter: बापाने मराठी शिकवलं नाही का? सचिन अहिरांची लेक झाली ट्रोल, उत्तर देत म्हणाली…

Sachin Ahir Daughter: सध्या सचिन अहिर यांची लेक किरण अहिर या चर्चेत आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या हिंदीमध्ये बोलत असल्यामुळे त्यांना ट्रोल करण्य़ात आले. आता त्यांनी या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

Sachin Ahir Daughter: बापाने मराठी शिकवलं नाही का? सचिन अहिरांची लेक झाली ट्रोल, उत्तर देत म्हणाली...
Sachin Ahir DaughterImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 1:14 PM
Share

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची बिनविरोध विधानसभा उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सचिन अहिर यांच्या लेकीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये किरण अहिर या हिंदीमध्ये बोलत होत्या. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. पण किरण देखील शांत बसल्या नाहीत. त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

काय आहे किरण अहिर यांचा नवा व्हिडीओ?

किरण अहिर यांनी काल एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी वडिलांच्या कामगिरीला पाठिंबा दिला होता. मात्र, या व्हिडीओमध्ये त्या हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले. आता या ट्रोलर्सला उत्तर देत किरण यांनी मराठीमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या हो मला मराठी येते. माझ्या बाबांनी लहान पणापासून मला मराठी शिकवली आहे असे बोलताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत किरण म्हणाल्या की, मी अनेक लोकांच्या टिप्पण्या वाचल्या. खूप लोकांनी लिहिले आहे, “हिंदीत का बोलतेस? तुझ्या बापाने तुला मराठी शिकवली नाही का?” सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की, होय, मला मराठी येते. माझ्या वडीलांनी बालपणापासून मला मराठी बोलायला, वाचायला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करायला शिकवले आहे. याचा मला अभिमान आहे. पण मी हिंदीत बोलते कारण मला माझा संदेश फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण भारतापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, त्यानंतर कोणत्यातरी राज्याचे.

पुढे किरण यांनी लिहिले की, जर भाषा एवढी मोठी गोष्ट असेल, तर मग आपण हिंदी चित्रपट का बघतो? हिंदी गाणी का ऐकतो? मग भाषेचा मुद्दा फक्त राजकारणातच का उपस्थित होतो? माझे मराठीवर तितकेच प्रेम आहे, जितके हिंदीवर. भाषेचे काम लोकांना जोडणे आहे, विभागणे नाही. शेवटी किरण यांनी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि। शुनि चैव” असे म्हटले आहे.

काय होता किरण यांचा जुना व्हिडीओ?

काल शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण म्हणाल्या होत्या की, माझ्या वडिलांनी पक्ष सोडला म्हणून टीका आणि तिरस्कार केला जात आहे. 2019 ला आदित्य ठाकरेंसाठी पक्ष सोडला आणि निष्ठेने पक्षात काम केलं त्याचं फळ आता मिळालं. माझ्या वडिलांबद्दल गेल्या काही दिवसापासून आरोप केले जात आहेत. माझ्या वडिलांना विचारलं जातंय की एवढी पद मिळाली तरी पक्ष का सोडला असे म्हटले. पक्षाने खूप काही दिलं याचा मी सन्मान करते. राजकारण म्हणजे राजकारण नाही तर जनसेवा करणे आहे. माझ्या वडिलांनी मेहनत निष्टेने काम केलं त्याचं फळ आता मिळालं आहे. माझ्या वडिलांनी 2019 ला आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्ष सोडला आणि त्यांना साथ दिली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ