AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पडळकरजी, कोलांट्या उड्या मारुन तुम्ही जिथे आलात, त्यांचा मूळ पक्ष स्वार्थासाठी विसर्जित झालेला”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही वाळीत टाकणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर विचाराचा आहे" असं सचिन खरात म्हणाले. राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

पडळकरजी, कोलांट्या उड्या मारुन तुम्ही जिथे आलात, त्यांचा मूळ पक्ष स्वार्थासाठी विसर्जित झालेला
gopichand-padalkar
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 10:29 AM
Share

पुणे : राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) सावध राहा, असा इशारा देणारा भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी सुनावलं आहे. कोलांट्या उड्या मारून तुम्ही ज्या पक्षात आज आला आहात, त्यांचा मूळ पक्ष स्वार्थासाठी जनता पार्टीत विसर्जित झाला होता, अशी आठवण खरात यांनी करुन दिली.

काय म्हणाले सचिन खरात?

“गोपीचंद पडळकरजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करण्यापेक्षा भाजप आणि धनगर आरक्षणाची काळजी करा. कोलांट्या उड्या मारून तुम्ही ज्या पक्षात आज आला आहात, त्यांचा मूळ पक्ष स्वार्थासाठी जनता पार्टीत विसर्जित झाला होता. पुढे दुहेरी सदस्यत्वावरुन तुमच्या पक्षाच्या लोकांना वाळीत टाकलं होतं. आता पुढे याची काळजी करा, की तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला कधी वाळीत टाकतील, याचा विचार करा, त्यामुळे ध्यानात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही वाळीत टाकणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर विचाराचा आहे” असं सचिन खरात म्हणाले.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आहोत, असे राष्ट्रवादी पक्ष वारंवार सांगत असतो. मात्र पक्षात खरंच लोकशाही आहे का? हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. ते जुन्नरमधील बेल्हे इथल्या भाजपच्या मेळाव्यास संबोधित करत होते.

राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली अशी दयनीय अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. राष्ट्रवादीची व्याख्या आता वेगळीच आहे. हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा घणाघातही गोपीचंद पडळकर यांनी केला.

“वळसे पाटील सावध राहा”

महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवारांनी (Sharad Pawar) पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृह मंत्रालय पाहिजे असतं. मग पवारांनी अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) शोधलं, त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.

संबंधित बातम्या :

VIDEO : राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील सावध राहा : गोपीचंद पडळकर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.